Nitesh Rane Majha Infra Vision : जलमार्गासंदर्भात आपण सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहायला पाहिजे. पर्यावरणाची हानी न करता, कांदळवनांना हात न लावता आपण असंख्य दुसरे मार्ग आहेतज्यामुळे आपण जलमार्ग सुरुकरू शकतो. 877 किलोमीटरची आपल्याला किनारपट्टी लाभलेलीआहे. धोरणनसल्यानेआत्तापर्यंत आपण त्याचा काय उपयोग करतोय, मला जुहूपासून मुंबईत यायला 50 मिनिटं लागली. आम्ही 2028 मध्ये मुंबई वॉटर मेट्रो सुरु करतोय, तेव्हा मी 16 ते 17 मिनिटांत मुंबईला येईन. एवढा फरक याजलमार्गातून पडणार असल्याचाविश्वासराज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनीव्यक्तकेलाआहे. एबीपीमाझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' (Majha Infra Vision) या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे बोलतहोते. (Nitesh Rane in Majha Infra Vision)
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्रातील स्थानिकांना 10 लाख रोजगार मिळणार, तसेच विकसित महाराष्ट्र 2047 मध्ये आमचं खाते नंबर 1 राहील, असाविश्वासहीत्यांनीयावेळीबोलतानाव्यक्तकेलाय.
Nitesh Rane: जहाजबांधणी क्षेत्रातून राज्यातील 60 ते 70 हजार तरुण-तरुणींना रोजगार मिळेल,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे, 2047 च्या विकसित महाराष्ट्राच्या प्रवासात जहाजबांधणी आणि बंदरांचं योगदान मोठं असेल. आपल्याकडे जहाजबांधणी क्षेत्राबाबत धोरण नव्हते. आपल्या या क्षेत्रात पुढे जायचं असले तर राज्याचे धोरण असण्याची गरज आहे. त्यामुळे उद्योजक या क्षेत्रात गुंतवणूक करु शकतात. राज्य सरकारने पहिल्या 100 दिवसांत घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्र हे आजघडीला जहाजबांधणी आणि जहाज तोडणी धोरण असलेले देशातील पहिले राज्य आहे. 2030 पर्यंत जहाजबांधणी क्षेत्रातून राज्यातील 60 ते 70 हजार तरुण-तरुणींना रोजगार मिळेल, यादृष्टीने आमची वाटचाल सुरु असल्याचेहीमंत्री नितेश राणे म्हणाले.
Nitesh Rane: मुंबईपासून ते मुंबई महानगरसह पालघरपर्यंत वॉटर टॅक्सीमधूनप्रवासशक्य
युरोपसहइतरअसंख्य देशांनीआज जलमार्गाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शहरांना एवढं सुंदर पद्धतीने जोडलेला आहे. त्यामुळे लोकांचा पैसा आणि वेळ योग्य पद्धतीने वाचतो आहे. आपल्या देशामध्येबघायचंझालंतरआपण कुठे-कुठे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून आपण जलमार्ग वापरतोय, तरतो कोचीमध्ये आहे. पण तो बॅकवॉटरमध्ये आहे. मात्र समुद्रामध्ये असलेला आपल्यामहाराष्ट्रातील हा मुंबई वॉटर मेट्रो जे आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीसयांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे, तेआपलंराज्यपहिलं राज्य असेल जो समुद्राच्या माध्यमातून जलमार्ग जोडतोय. ते काम आम्ही एवढा फास्ट पद्धतीने सुरू केलंयकी मुंबई वॉटर मेट्रोचा पहिला जलमार्गाचा टप्पा आपण 2028 पासून सुरु करणार आहोत. आम्ही तीन रूट सुरू करणार आहोत. त्या निमित्ताने आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला मुंबईपासून ते पूर्ण एमएमआर रिजनसह पालघरपर्यंत, म्हणजे जे आमचे मुख्यमंत्री साहेब पालघरमध्ये तिसरी मुंबई आणि तिसरा एअरपोर्ट बद्दल उल्लेख करतायेत त्या तिसऱ्या एअरपोर्टकडे तुम्ही जलवाहतुकीच्या निमित्ताने वॉटर टॅक्सीमधून पोहोचू शकतो, असा विश्वाससही मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनीव्यक्तकेला.
इतर महत्वाच्या बातम्या
