एक्स्प्लोर

मंत्री असतानाही मुस्लिम समाजाविरोधात द्वेषाचे वक्तव्य; नितेश राणेंवर कारवाई करा, अबू आझमींचं आंदोलन

संवेदनशील पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री हे सातत्याने मुस्लिम विरोधी द्वेषाचे वक्तव्य करून दोन धर्मामध्ये वाद निर्माण करीत आहेत.

मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम (Muslim) समाजाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करून सामाजिक वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टी तर्फे आज मुंबई / महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज समाजवादी पक्षाने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले. यावेळी बोलतांना अबू आझमी (Abu azami) यांनी मंत्री नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणीही केली. नितेश राणेंकडून (Nitesh Rane) सातत्याने मुस्लिम समजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य केले जात आहे. सरकारमधील मंत्रीच अशी वक्तव्ये करत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करावी, असे आझमी यांनी म्हटले. 

पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले की, पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. परंतु, अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री हे सातत्याने मुस्लिम विरोधी द्वेषाचे वक्तव्य करून दोन धर्मामध्ये वाद निर्माण करीत आहेत. तसेच, दादर व मुंबई मधील इतर विभागात मुस्लिम समाजाच्या फेरीवाल्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही मंत्री नितेश राणे आणि त्यांच्यासारख्या मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत आहोत, असे आझमी यांनी म्हटले. 

या मागणीसह सर्वोच्च न्यायालयाने 2023 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दिलेल्या निकालानुसार दोषी व्यक्ती आणि संघटनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. धर्मनिरपेक्ष संबंधांची पर्वा न करता द्वेष पसरवणाऱ्या, हिंसाचाराला प्रवृत्त करणाऱ्या, जनतेला धमक्या देणाऱ्या, आर्थिक बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या, धर्म, जात, प्रदेश, भाषा या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सर्व संघटनांवर बंदी घालण्यात यावी. प्रत्येक नागरिकाच्या व्यवसाय, व्यापार, धंदा करण्याच्या मूलभूत अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे राज्याने आपल्या घटनात्मक कर्तव्यानुसार संरक्षण करावे, अशी देखील मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. 

पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धा आणि विश्वासाच्या स्वातंत्र्याचे राज्याने संरक्षण करावे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेदानुसार राज्यात शांतता आणि न्यायाचे वातावरण असावे. शांतता, कायदा आणि संविधानाच्या शत्रूंना कायद्याच्या कचाट्यात आणून आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर आणि कठोर शिक्षा देऊन कायद्याचे राज्य आणि न्याय अत्यंत पारदर्शकपणे प्रस्थापित करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलनाचे निवेदन समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांना दिले. यावेळी समाजवादी पार्टीचे मेराज सिद्दीकी, युसूफ अब्रानी, राहुल गायकवाड, कुबेर मौर्या, सईद खान, झेबा मलिक यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

Video अल्लाहू अकबर म्हणणारा जिपलाईन ऑपरेटर पोलिसांच्या ताब्यात; मुज्जलिमचे वडिल स्पष्टच बोलले, म्हणाले...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 Team India Celebration: कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार-गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
India won T20 World Cup : विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
Embed widget