Nitesh Rane and Aaditya Thackeray: दिल्लीमध्ये झालेल्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) 6 खासदार फुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या मोठ्या राजकीय भूकंपावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सिंधुदुर्गातून पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर अत्यंत बोचरी आणि घणाघाती टीका केली आहे. "ठाकरे गट हा काँग्रेसमध्ये विलीन (Merge) होणार होता, म्हणूनच या 6 खासदारांनी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले," असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांची तुलना थेट पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्याशी केली आहे.

Continues below advertisement

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना नितेश राणे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. "ऑपरेशन टायगर झालं त्याबाबत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी माहिती दिली आहे. त्यावर तुम्ही तुडवा, जुडवा, बुडवा काही बोला. पण याला जबाबदार कोण याचा विचार करा. जसं तृणमूल काँग्रेसमध्ये एक अभिषेक बॅनर्जी आहे, तसा उबाठाच्या अभिषेक बॅनर्जीला का प्रश्न विचारत नाही? आदित्य ठाकरे यांना विचारा, तू असताना तुझे खासदार का सोडून गेले? तृणमूलचा अभिषेक बॅनर्जी उबाठामध्ये आदित्य ठाकरे. जसं अभिषेक बॅनर्जीला पश्चिम बंगालमध्ये हेल्मेट घालून फिरण्याची वेळ आली, तसं एक हेल्मेट आदित्य ठाकरेंना पाठवणार. महाराष्ट्रामध्ये फिरताना चुकून अंडी आणि चपला आल्या, तर हेल्मेट हवं. पण त्यासाठी पेंग्विन हेल्मेट घालून कसा दिसेल हे वेगळं संशोधन आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. 

Nitesh Rane and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याचा प्रस्ताव

नितेश राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचां पक्ष ज्याला आपण उबाठा म्हणतो, तो काँगेसमध्ये विलीन होणार होता. म्हणून त्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. बाळासाहेबांचे विचार हे काँग्रेसच्या विरोधात विचार होते. माझ्या शिवसेनेची कधीही काँगेस होऊ देणार नाही, नाहीतर दुकान बंद करेन, असं बोलणारे आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला तिलांजली देऊन उद्धव ठाकरे पक्ष काँगेसमध्ये विलीन करणार होते. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात बैठका झाल्या होत्या. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याचा प्रस्ताव आला होता. बाळासाहेबांचे विचार यांना बुडवायचे असतील तर यांच्यासोबत खासदार कशाला राहणार? संजय राऊत कसल्या बाळासाहेबांच्या विचारांबद्दल बोलतायेत? तुम्ही काँगेसमध्ये विलीन होणार होता तर नेहरू, गांधीचा गोडवा गावा, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

Continues below advertisement

शेंमड्यासारखी महाविकास आघाडी बोलेल त्याला काही अर्थ नाही. मुळात महाराष्ट्र व्हर्जन ऑफ अभिषेक बॅनर्जीला आवरलं पाहिजे होतं. हे आरोप करण्याची वेळ आली नसती. हिंदुत्वावर तयार झालेले शिवसैनिक त्यांनी जेव्हा बघितलं की, हे काँग्रेस विचाराला, जिहादला स्वीकारणारे आहेत, हिंदुत्वविरोधी भूमिका साकारणारे आहेत, म्हणून ते पुढे गेले नाहीत. यापलीकडे विचार महत्त्वाचे असतात, हे रोहित पवारला कळणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्या टीका केली. 

Nitesh Rane on Uddhav Thackeray: सर्वात मोठे गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर 

गद्दारांच्या संरक्षणासाठी पोलीस लावले म्हणतात, मग उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर संरक्षण सोडावे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तर, संजय राऊत यांचा राजकीय जन्म केव्हा झाला, हे कोणाला विचारलं पाहिजे की तो राजकीय लावारिस आहे? राजकीय क्षेत्रात कचऱ्याच्या डब्यातून त्याला उचले काय? उगाच अमित शाह आणि भाजपला यात ओढू नये. बाळासाहेबांच्या विचाराला एकनाथ शिंदे यांनी तुमच्यावर टाकलेले हे पाऊल आहे. संजय राऊत यांच्यासारखे राजकीय धर्मांतर झालेले नाही, असे म्हणत यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच ओमराजे निंबाळकरांचा पहिला वार, म्हणाले, उद्धव ठाकरेंचं समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी....