नवी दिल्ली: नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या तीव्र निदर्शनांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची दखल घेतली असून, पेपर लीक करणाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Nirmala Sitharaman on Neet Paper Leak)
'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. सरकार या संपूर्ण प्रकरणाबाबत अत्यंत संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. पेपर लीकसारख्या दुर्दैवी घटनेनंतरही अनेक विद्यार्थ्यांनी हार मानली नाही, तर या आव्हानाचा स्वीकार करून अधिक जोमाने तयारी केली आणि उत्तम कामगिरी करून दाखवली, असेही त्या म्हणाल्या.(Nirmala Sitharaman on Neet Paper Leak)
Nirmala Sitharaman on Neet Paper Leak : "विद्यार्थ्यांनी आव्हानाचा फायदा घेत यश मिळवले"
निर्मला सीतारामन म्हणाल्या, "असे अनेक तरुण आहेत जे पुढे येऊन सांगत आहेत की, 'होय, जेव्हा पेपर लीक झाला तेव्हा मला वाईट वाटले, पण नंतर मी त्याचा फायदा घेतला. मी आणखी चांगली तयारी केली, ज्यामुळे माझी कामगिरी अधिक सुधारली.' त्यामुळे असेही तरुण आहेत ज्यांनी या आव्हानाला सामोरे जात उत्तम यश संपादन केले आहे."
Nirmala Sitharaman on Neet Paper Leak : वेळेत झाली कारवाई
प्रकरणाच्या गांभीर्याबद्दल बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "सरकारने या घटनेनंतर वेळेत योग्य ती पावले उचलली. या प्रकरणात अटक करण्यात आली, वेळेत पुनरुपरीक्षा (Re-exam) घेण्यात आली आणि निकालही जाहीर करण्यात आले. यामुळेच आज तरुण आपल्या क्षमतेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत."
Nirmala Sitharaman on Neet Paper Leak : हा मुद्दा अत्यंत संवेदनशील
विरोधकांच्या हल्ल्यांवर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "हा विषय देशातील विद्यार्थी आणि तरुणांशी संबंधित आहे; विशेषतः त्यांच्या परीक्षेची तयारी, पेपर लीक आणि पुन्हा परीक्षा होणे या सर्व बाबींशी जुळलेला आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय विचारात घेता, या गोष्टी अत्यंत संवेदनशील असतात."
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "जर सरकार संवेदनशील नसती किंवा सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसती, तर मी विरोधकांच्या या टीकेचा अर्थ समजू शकले असते. मात्र, स्वतः पंतप्रधान स्तरावरून यावर उत्तर देण्यात आले आहे. पेपर लीकसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना कडक शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे."
Rohini Khadse: अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्या वक्तव्यावरून रोहिणी खडसे यांनी काढला चिमटा
पेपर फुटला ते चांगलं झालं, विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याचा वेळ मिळाला असे वक्तव्य अर्थमंत्री सिताराम यांनी केले असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सिताराम यांना चिमटा काढला आहे. खडसे म्हणाल्या की, "रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे" च्या घवघवीत यशानंतर सर्वश्रेष्ठ अर्थमंत्री निर्मलाअक्का घेऊन आल्या आहेत "पेपर फुटला ते चांगलं झालं, विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याचा वेळ मिळाला" अंधेर नगरी चौपट राजा! असा सगळा कारभार आहे असे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, माझा निर्मलाअक्कांना एक सल्ला आहे. अर्थात सल्ला देण्याइतकी मी मोठी नाही पण तरी... अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर अजिबात लागू नका कारण हे धर्मेंद्र प्रधान सोडतील आणि तुमच्याच राजीनाम्याची मागणी करतील !
