एक्स्प्लोर

Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्..., नेमकं काय घडलं?

Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या आंध्र प्रदेशातील एका कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एका कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. 2 ऑक्टोबर रोजी अन्नमय्या जिल्ह्यातील मदनपल्ले येथे आयोजित कार्यक्रमात सीतारमण भाषणासाठी उभ्या राहिल्यानंतर काही वेळातच गर्दीतून मोठ्या आवाजात घोषणा ऐकू आल्या. त्यामुळे सीतारमण यांना काही काळ आपलं भाषण थांबवावं लागलं. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी नेमकं काय घडलं, यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

मदनपल्ले येथे 1 लाख कोटी रुपयांच्या ग्लोबल हॉर्टिकल्चर हब प्रकल्पाचा शुभारंभ तसेच इंडियन स्कूल ऑफ अॅग्रीकल्चरच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Nirmala Sitharaman: निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहताच गोंधळ

कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारमण भाषणासाठी पोडियमवर आल्या. त्यावेळी उपस्थितांकडून घोषणाबाजी आणि मोठा आवाज सुरू झाला. काही जण स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही काळ कार्यक्रमातील वातावरण गोंधळाचे झाले आणि सीतारमण यांना आपलं भाषण थांबवून उपस्थितांना शांत राहण्याचं आवाहन करावं लागलं.

Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्...

सीतारमण यांनी गर्दीला शांत राहण्याची आणि आपलं म्हणणं ऐकून घेण्याची विनंती केली. मात्र काही काळ परिस्थिती कायम राहिल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः माईक हाती घेतला. त्यांनी उपस्थितांना शांत राहण्याचं आणि अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकण्याचं आवाहन केलं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि निर्मला सीतारमण यांनी पुढे आपलं भाषण सुरू केलं.

Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंचं जयराम रमेश यांच्या दाव्यावर उत्तर 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी या घटनेवर भाष्य करताना जनतेमध्ये सरकारविरोधात नाराजी असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना स्वतः माईक हाती घेऊन लोकांना शांत करावं लागलं, असा दावा त्यांनी केला. मात्र चंद्राबाबू नायडूंनी जयराम रमेश यांच्या दाव्याला थेट उत्तर दिलं आहे. नायडूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत व्हायरल व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमात जे घडलं ते जनतेचा संताप किंवा सरकारविरोधातील नाराजी नव्हती, तर उपस्थितांकडून मिळालेला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद होता.

नायडूंनी जयराम रमेश यांना उद्देशून सांगितलं की, “जयराम जी, जे घडलं त्याबद्दल तुमची समज वास्तविकतेपासून खूप दूर आहे.” उपस्थित लोकांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्याला काही काळ मंचावर हस्तक्षेप करावा लागला, असं त्यांनी स्पष्ट केलं. नायडू पुढे म्हणाले की, लोकांचा उत्साह आणि आनंद हा संताप म्हणून पाहणे म्हणजे आंध्र प्रदेशातील तसेच संपूर्ण भारतातील जनतेच्या भावना समजून घेण्यात अपयश असल्याचं दर्शवतं. राजकीय हेतूने सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या चर्चेमुळे प्रत्यक्ष कार्यक्रमात लोकांनी व्यक्त केलेली भावना बदलणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस नागपूरच्या लोहारी सावंगा गावात साजरा करणार सण, गावातच मुक्काम
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस नागपूरच्या लोहारी सावंगा गावात साजरा करणार सण, गावातच मुक्काम
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Embed widget