Nilesh Rane on Shiv Sena UBT : वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. तर ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहांनी (Amit Shah) जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, भाजपने हिंदुत्व सोडलं का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले. आता कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे म्हणाले की, उबाठा हा पक्ष वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयक लोकसभेत पास झालं म्हणून दुःखात आहे. कायदेशीर बाबी या विधेयकात आल्या हे उबाठाला पचत नाही. त्यामुळे उबाठाची बाप मेल्यासारखी परिस्थिती झालीय. तुम्ही एका समाजाचे, एका धर्माचं तुम्ही लांगुनचालन करा. पण हा देश कायद्याने, संविधानाने चालतो. प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे. मुसलमानांना वेगळा कायदा या देशात नाही. त्यांच्या जमिनी म्हणजे काय? कायद्याचे अंतर्गत ज्या जमिनी तुमच्या तुम्ही घ्या, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणालाच नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला किती जरी वाईट वाटलं असेल तरी वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानेच इकडे चालणार, हा देश कायद्याने चालणार आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
निलेश राणेंची ओवैसी बंधूंवर टीका
निलेश राणे पुढे म्हणाले की, ओवैसी बंधू हे देशाचे कायदे मानत नाहीत. विधेयक फाडणे म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट फाडणे आणि तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची वार्ता करता? तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल डॉक्युमेंट फाडल्यानंतर तुम्ही हातात संविधान घेऊन तुम्ही दाखवता ना, त्याचा रिस्पेक्ट करता का तुम्ही? तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहात. त्या संविधानाचा अपमान करत आहात. काही समाजातील लोकांना असं वाटतं की, आम्ही करू तोच कायदा. काँगेसने अनेक वर्षे त्यांना सांभाळायचं काम केलं. ओवैसीच्या त्या दोन्ही भावंडांना हा देशच त्यांचा नाही असं वाटतं. ते पाकिस्तानचेच आहेत. ते पाकिस्तानचे म्हणून मरणार आहेत. त्यांना आपल्या देशाबद्दल आस्था नाही. ते भारत माता की जय म्हणत नाही, वंदे मातरम म्हणत नाही, जनगणमन म्हणत नाही, अशा अवलादी पाकिस्तानच्या अवलादी आहेत. या भारतात येऊन बोलतात, याचा दुःख आहे, असे म्हणत त्यांनी ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली आहे.
आणखी वाचा
