Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil: अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) जमीन व्यवहार आणि ZR 2 बायो एनर्जी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात गंभीर आरोप करत थेट राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची ED आणि CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निलेश लंके यांनी दावा केलाय की, श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 4 हजार एकर शेती महामंडळाची जमीन ZR 2 कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू होती. ही जमीन खाजगी कंपनीला देण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यासाठी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासोबतच ZR 2 कंपनीच्या खात्यात अवघ्या एका महिन्यात 100 कोटी रुपये जमा झाल्याचा दावा लंके यांनी केला. हा पैसा हवाला मार्गानं आला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून या व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
निलेश लंके पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
खासदार निलेश लंके म्हणाले की, "श्रीरामपूर तालुक्यातील 4 हजार एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. शेती महामंडळाकडे असलेली 4 हजार एकर जमीन झेडआरटु या कंपनीला दिली आहे. ही कंपनी कुठल्या राजकीय लोकांची आहे त्याचे पुरावे आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात 3 मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. ZR 2 ही कंपनी दुबईत रजिस्टर अबुधाबीमध्ये आहे आणि त्याचं ऑफिस मुंबईत आहे. हा सगळा पैसा हवाला मार्फत वापरण्यात आला आहे."
पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, "या कंपनीनं 61 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीचे संचालक दोन संचालक आहेत. प्रवरा बायोएनारजी कंपनीच्या संचालकांमध्ये सुप्रिया राधाकृष्ण विखे पाटील संचालक आहेत. या कंपन्या एकाच फ्लॅट वर रजिस्टर केलेल्या आहेत. अजित नामदेवराव ढोकणे हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जावई तर सुप्रिया विखे या राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलगी आहे. ज्या कंपनीनं 4 हजार एकर जमिनीची मागणी केली आहे, ती फेक कंपनी आहे."
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित ही कंपनी : निलेश लंके
"राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित ही कंपनी आहे. याच कंपनीसाठी 4000 एकर जमीन मागण्यात आली आहे. अजित ढोकणे विखेंचे जावई त्या कंपनीचे संचालक होते. शीतल पुरव या कंपनीच्या सेक्रेटरी होत्या त्यांनी अनियमतेमुळे राजीनामा दिला. तुम्ही जमीन दिली नाही पण मागणी तर केली होती ना?", असा सवालही निलेश लंके यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पुढे बोलताना "श्रीरामपूर तालुक्यातील 4000 एकर शेती महामंडळाची जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीनं मागितली होती, ही कंपनी दुबईत नोंदणी झालेली. मुंबईत कार्यालय आहे. जिमी वॉल्सन आणि निलेश जैन कंपनिचे संचालक आहेत. ZR 2 होल्डिंग कंपनीनं ZR 2 बायो कंपनीकडून शेअर्स खरेदी केले होते. प्रवरा बायो एनर्जी कंपनीचे संचालक सुप्रिया राधाकृष्ण विखे, निलेश जैन आहेत. जिमी होल्सन हे देखील प्रवरा बायो एनर्जी कंपनीचे संचालक आहेत.", असं निलेश लंके म्हणाले.
"ZR 2 ग्रुप होल्डिंग कंपनी ज्यांनी स्थापन केल्या तेच हे आहेत. जिमी वॉल्सनचं नागरिकत्व स्वीडनचं आहे, अजित नामदेवराव ढोबळे हे राधाकृष्ण विखे यांचे जावई आहेत. सुनील कलापुरेचं नावही यात आहे, ZR 2 बायो एनर्जीला सुनील कलापुरे संचालक आहे. तोच विठ्ठलराव विखे पाटील संस्थेत पण आहे, त्याचे अध्यक्ष आहेत, राधाकृष्ण विखे पाटील...", अशी माहितीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
