एक्स्प्लोर

Nilesh Lanke: निलेश लंकेंनी अभियंता ठेकेदाराच्या श्रीमुखात लगावली? दोन्ही बाजूने पडदा पडला, खासदारासह अधिकारी म्हणतात 'असं काही घडलं नाही, 'ध'चा 'मा'...'

Nilesh Lanke: रखडलेल्या कामावरून खासदार निलेश लंके काल (गुरुवारी) आक्रमक झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍याच्या कानशिलात लगावल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळासह सर्वत्र खळबळ उडाली.

श्रीगोंदा:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार निलेश लंके आपल्या कामामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र आता निलेश लंके हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. ते म्हणजे आढळगाव (ता. श्रीगोंदे) शिवारात 548 डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून खासदार निलेश लंके काल (गुरुवारी) आक्रमक झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍याच्या कानशिलात लगावल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळासह सर्वत्र खळबळ उडाली. या चर्चांवरती मात्र, खासदार निलेश लंके आणि विभागाचे अधिकारी दोघांनीही नकार देत 'ध'चा 'मा' करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याचं काम रखडल्यामुळं सुभान तांबोळी यांनी आढळगाव या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर काल (गुरुवारी ता.15) खासदार निलेश लंके त्यांची भेट घेऊन उपोषणाला बसण्यासाठी तेथे गेले होते. त्या वेळी वारंवार आंदोलने व उपोषण करूनही काम पूर्ण होत नसल्याच्या कारणाने खासदार लंके संतप्त झाले. लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता व निखील कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍याला जाब विचारला. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांना या रस्त्यावर प्राण गमवावे लागल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

लंकेंनी उपअभियंता व ठेकेदाराच्या कानशिलात लगावल्याची चर्चा 

श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548चे आढळगाव शिवारातील काम रखडल्यामुळे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी पोहोचलेल्या खासदार नीलेश लंके यांनी कामाबाबत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर उपअभियंता व ठेकेदाराच्या कानशिलात लगावल्याची जोरदार चर्चा आहे. आढळगाव गावठाण हद्दीमधील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडलं आहे. हे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुभान तांबोळी आणि ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. काल (गुरुवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनास्थळी भेट दिली. त्यावेळी काम का रखडले? असा प्रश्न करत त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी संताप अनावर झाल्याने त्यांनी उपअभियंता व ठेकेदार कंपनीच्या कामगाराच्या कानशिलात लगावली असल्याची चर्चा आहे.

रस्त्याचे काम रखडल्याने अधिकारी, ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी लंके अधिकारी व ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात घेऊन आले. ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनेकांचा जीव गेल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री आठपर्यंत ते पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्याची माहिती आहे. दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी या कंपनीच्या अधिकार्‍याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा रंगली आहे.

कानशिलात लगावल्याच्या चर्चेवर लंके काय म्हणाले? 

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, कानशिलात लगावल्याच्या चर्चेवर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आढळगाव येथे आंदोलन स्थळी गेलो असता मी माझ्या स्टाईलने अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, 'ध'चा 'मा' करण्यात आला आहे. मी कुणावरही हात उचलला नाही. मात्र, आढळगाव ते जामखेडपर्यंतच्या अपूर्ण कामात हलगर्जीपणा झालेला आहे. यापुढे तो होऊ देणार नाही, असंही पुढे नीलेश लंके यांनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Online School Demand: देशातील शाळांमध्ये तात्पुरत्या ऑनलाईन वर्ग? इंधन बचतीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर पालक संघटनेची मागणी, सरकारला विनंती पत्र
देशातील शाळांमध्ये तात्पुरत्या ऑनलाईन वर्ग? इंधन बचतीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर पालक संघटनेची मागणी, सरकारला विनंती पत्र
Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
Maharashtra Live Blog Updates: निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर
Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...
Raj Thackeray 2008 Railway Case: गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mandana Karimi Leaves India After 16 Years: 16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...
Nashik TCS Case Matin Patel : मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
Embed widget