Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Satara Zilla Parishad Election 2026) मोठा गोंधळ उडाला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil) यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या धक्काबुकीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरल्याची घटना घडली होती. प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या अभूतपूर्व गोंधळाची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत. तर मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी या निलंबनाला कडाडून विरोध केला. यामुळे विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे दिसून आले.
जयकुमार गोरे म्हणाले की, सभापती महोदया तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे होतं, तत्पूर्वी तुम्ही निर्देश दिले. ज्याचं अपहरण झालं तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या कुटुंबियांनी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केला होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे करण्याचे काम कुणी केले. चार हजार लोकं जिल्हा परिषदेत घुसले ते कुणी आणले? याचे देखील उत्तर द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले.
Jaykumar Gore: तुमच्या निर्णयावर हरकत नाही, मात्र...
जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, सभापती महोदया तुम्ही माझ म्हणणं ऐकून घ्या ना. तुम्ही ऐकून घेत नाहीत. मी देखील वस्तुस्थिती सांगत आहे. तुम्ही माझ म्हणणं ऐकून घ्या, असे म्हटले. यावर नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात पोलीस घुसले होते की नव्हते ते तुम्ही सांगा? असे म्हटले. यावर जयकुमार गोरे म्हणाले की, सभापती महोदय तुम्ही कोणत्या प्रकारे वस्तुस्थिती जाणून न घेता एका अधिकाऱ्याला निलंबित करता कसं काय? तो आयपीएस दर्जाचा अधिकारी आहे. तुम्ही असा कसा निर्णय घेतला? तुमच्या निर्णयावर हरकत नाही. मात्र, जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे. कार्यकर्ते कोणी आणले? भाजपवर कसं काय आरोप करता? तिथे जबरदस्ती सीइओ यांना बैठक कोणी घ्यायला लावली? असे म्हणत त्यांनी निलंबनाला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळाले.
Satara Zilla Parishad: सत्ताधारी पक्षातच जुंपली
यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातच जोरात जुंपल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना राष्ट्रवादी आमदारांनी घोषणाबाजी करत निवडणुकीला स्थगिती द्या, अशी मागणी केली. तर जयकुमार गोरे यांनी तुम्ही आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन रद्द करा, अशी मागणी केली. यानंतर उदय सामंत म्हणाले की, आम्ही कुठेही भाजपचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे चुकीचे पटलावरून काढून टाका. तर शंभूराज देसाई म्हणाले की, सभागृहात उपस्थित असताना नीलम गोऱ्हे यांनी आमची बाजू समजून घेतली. सभागृहात सांगण्यात आलं की, मंत्री जखमी झाला आहे. एवढी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. माझ्या अंगावर पूर्णपणे रक्त पडलं. मंत्र्याला मारहाण झालेली तुम्ही कधी ऐकले आहे का? सभापती तुम्ही सांगा बोलू नका. आम्ही तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि इथून निघून जातो. तुम्ही लक्षात घ्या राज्याच्या इतिहासात आतापर्यंत कधीही मंत्र्याला पोलिसांनी मारहाण केली असं कधी ऐकलं आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आणखी वाचा
