NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग आज सकाळी होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे (Sharad Pawar NCP) सर्व आठ खासदार आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेत ही भेट होणार आहे. राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.दरम्यान या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार का याकडेही लक्ष लागलं आहे. (NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi)

Continues below advertisement

पुढच्या आठवड्यात संसदेत डिलीमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे ही भेट होत असल्याने भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय. तर शरद पवार गटाच्या खासदारांच्या भेटीवरुन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भेटीगाठींमध्ये, काहीतरी शिजतंय, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर कुणीही मविआ सोडणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितले. (NCP Sharad Pawar MP Maharashtra Politics)

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची यादी- (NCP Sharad Pawar MP List)

 
  • सुप्रिया सुळे - बारामती
  • डॉ. अमोल कोल्हे - शिरूर
  • धैर्यशील मोहिते पाटील - माढा
  • भास्कर भगरे - दिंडोरी
  • बाळ्यामामा म्हात्रे (सुरेश म्हात्रे) - भिवंडी
  • बजरंग सोनावणे - बीड
  • अमर काळे - वर्धा
  • निलेश लंके - अहमदनगर

अमित शाह आज लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयकं सादर करणार- (Amit Shah will present two important bills in the Lok Sabha)

दिल्लीतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयकं सादर करणार आहेत. यामध्ये केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याची तरतूद करणारे विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक यांचा समावेश आहे. दरम्यान  दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जप्रकरणी अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावं, या मागणीवरून विरोधकांकडून संसदेत गेल्या दोन आठवड्यांपासून गदारोळ सुरू आहे. त्यामुळे आजतरी संसदेच कामकाज पार पडणार की पुन्हा गोंधळातच दिवस जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

संबंधित बातमी:

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!