मुंबई : राज्यात सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरण आणि व्हिडिओने धुमाकूळ घातला असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचेही खासगी व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मंत्र्‍यांच्या शासकीय निवासस्थानी ते महिलेसोबत (तृतीयपंथी) दिसून येत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता, आमदार रोहित पवार यांनीही यासंदर्भाने भूमिका मांडली. व्हिडिओत दिसणारे सर्वजण 18 वर्षांपेक्षा जास्त आहेत, ते सज्ञान आहेत. त्यामुळे, कोणाची तक्रार नसेल तर यावर राजकीय बोलणं उचित नाही. मात्र, महिलेची तक्रार असल्यास नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांना सोडायचं नाही, असा इशारही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलाय. 

Continues below advertisement

झिरवाळ यांच्या बंगल्यावरील व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत, त्यांचं वय नक्कीच 18-19 च्या पुढे आहे. त्याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे की नाही ते पाहावे लागेल. पोलिसांकडे जर तक्रार दिली असेल तर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे. वयाने जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांसमोर आले असले तरी महिलेची तक्रार नसेल तर यावर राजकीय बोलणं अवघड जात आहे. मात्र, महिलेने जर कंप्लेंट केली असेल तर झिरवळ साहेबांना सोडायचं नाही, असा इशाराच रोहित पवार यांनी दिलाय. 

रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. तटकरे म्हणाले मी महाविकास आघाडीच्या बैठकीला नव्हतो. अहो तुमचा नेता आणि माझा काका याच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी 1200 किमी दूर कर्नाटकात होतो, असा पलटवार रोहित पवार यांनी केला. तसेच, जयंत पाटील आणि माझ्यात जो विषय आहे तो आमच्या पक्षाचा विषय आहे. इथ मी लढत आहे माझ्या काकासाठी कारण मला ते चिरंजीव म्हणायचे. तुम्ही त्यांना किती त्रास दिला हे जगजाहीर आहे. तुमच्या पार्लरची, हेलिकॉप्टरची बिले, हॉटेलची बिले पक्षाच्या खर्चात जोडत होतात. आता त्यांच्या पक्षाच्या खात्याची माहिती घेतली तर लक्षात येईल पुरेसे पैसे खात्यात नाहीत, असे म्हणत रोहित पवार यांनी सुनिल तटकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. 

Continues below advertisement

म्हणून मी गुन्हा दाखल केला

मुख्यमंत्री यांनी सभागृहात भाषण केलं. मुख्यमंत्र्‍यांनी आश्वासन दिलं आहे की, जर काही असेल तर आरोपीला खोदून काढू. मला मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे. तसेच, मुख्यमंत्री म्हणाले टेक्निकली कर्नाटकात गुन्हा दाखल होऊन उपयोग नाही, त्यासाठी व्हिक्टिम असायला हवा. आता व्हिक्टीम स्वत: अजित पवार आणि ते कसं काय गुन्हा दाखल करणार, कुटुंब म्हणून मी गुन्हा दाखल केला आहे, असेही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले.  

हेही वाचा

पेट्रोलचा मुबलक साठा, सोशल मीडियात अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार; मंत्री गिरीश महाजनांचा इशारा