एक्स्प्लोर

Rajya Sabha Bypoll : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज, मविआकडून अर्ज नाही; बिनविरोध निवड निश्चित

Rajya Sabha Election Updates : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीकडून NCP चे नेते राजेंद्र जैन यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

मुंबई : राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीकडून राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. राज्यसभेसाठी एका अपक्षाचा अर्ज दाखल झाला असून तो अवैध ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच राजेंद्र जैन यांची निवड निश्चित मानली जात आहे. 

अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ राजेंद्र जैन यांचाच मुख्य अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा झाला आहे. त्यांच्याशिवाय एका अपक्ष उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे; मात्र मंगळवारी होणाऱ्या अर्ज छाननी प्रक्रियेत हा अपक्ष अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतल्याने आता ही निवडणूक केवळ औपचारिकता उरली आहे.

Who Is Rajendra Jain : प्रफुल्ल पटेलांचे विश्वासू

राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विदर्भातील एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांचा पक्षात प्रभाव वाढत गेला. पक्षाने यापूर्वी त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मधील विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भाजपचे परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता. आता थेट राज्यसभेवर जात ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत.

Chhagan Bhujbal Disappointment : 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धीबळाचा नाही'

या संपूर्ण उमेदवारी प्रक्रियेदरम्यान महायुतीमध्ये आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत मोठी राजकीय अस्वस्थता पाहायला मिळाली. राज्यसभेच्या या जागेसाठी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावर अनपेक्षितपणे शिक्कामोर्तब करण्यात आले.

राजेंद्र जैन यांचा अर्ज भरून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी सूचक शेरोशायरीतून व्यक्त केली. स्वतःला डावललं गेल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, असे आमचे धोरण आहे.

मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा खेळाडू नाही, असं म्हणत पक्षातील अंतर्गत राजकारणावर भुजबळांनी थेट निशाणा साधला. पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळेही ते अप्रत्यक्षपणे नाराज असल्याचं दिसून आले.

ही बातमी वाचा:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Navneet Rana : लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी दुसऱ्यांच्या दारात गेली नाही, त्याला ठोकर मारली : नवनीत राणा
लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी दुसऱ्यांच्या दारात गेली नाही, त्याला ठोकर मारली : नवनीत राणा
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget