एक्स्प्लोर

Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!

Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.

Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: राज्यसभेच्या 26 जागांसाठी (Rajya Sabha Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Politics) सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यसभेसाठी राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज सकाळी 11.30 वाजता राजेंद्र जैन यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते.

अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या जोडगोळीच्या अजूनही कायम असलेल्या वर्चस्वाची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर त्यांचं पक्षातील महत्व वाढल्याचं पाहायला मिळत आहे, असं शशिकांत शिंदेंनी सांगितले. छगन भुजबळ संघर्ष करणारे नेते आहेत. दिल्लीतून मंजूरी दिली नसेल तर माहिती नाही. शरद पवारांनी अनेक लोकांना उभे केले. त्यांनी अनेकांना न्याय दिला तो आता का मिळत नाही? याचा विचार त्यांनी करावा, असंही शशिकांत शिंदेंनी सांगितले. 

सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी शरद पवारांची घेतली होती भेट- (Sunil Tatkare And Praful Patel Meet Sharad Pawar)

अवघ्या काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नसल्याने एकच गहजब झाला होता. तटकरे-पटेलांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची आणि सुनेत्रा पवार या दोघांवर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त तेव्हा पसरले होते. यानंतर काही दिवस सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साईडलाईन करण्यात आल्याचेही सांगितले जात होते. याचदरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली होती. परंतु दोघांच्या भेटीच्या टायमिंगची चांगलीच चर्चा रंगली होती.

राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

  • नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
  • नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
  • मतदानाची तारीख (Date of Poll): 18 जून 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
  • मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget