Amol Mitkari : आज 9 सदस्यांचा निरोप समारंभ आहे. सभागृहात आज तरी अजित पवार (Ajit Pawar) यांचा विषय असेल, अशी आशा होती. मात्र आमच्या सारखा कार्यकर्ता कुठे कमी पडला असेल, असं म्हणावे लागेल. याबाबत मी खेद व्यक्त करतो. कुणालाही दादांच्या बाबतीत काय झालं याचं गांभीर्य वाटत नाही. सरकारला दादांच्या विमान अपघाताचं (Ajit Pawar Death News) गांभीर्य नाही, म्हणूनही चर्चा होऊ शकली नाही. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे (Captain Ashok Kharat) इतके सीसीटिव्ही सापडले, मात्रअजितदादांच्या बाबतीतले सीसीटिव्ही सापडत नाही? असासवालकरतराष्ट्रवादीअजितपवारगटाचेआमदारअमोलमिटकरींनीपुन्हाएकदादिवंगतअजितपवारांच्याअपघाताबाबतभाष्यकेलंआहे. (Amol Mitkari on Ajit Pawar Death News)
Amol Mitkari on Ajit Pawar Death News: शेवटच्या श्वासापर्यंत ही सल कायम राहिल
आतापर्यंत सीआयडी चौकशीत किती जबाब नोंदवले गेले? विमानातली कागद जाळली नाही आणि ब्लॅकबाॅक्स जळला? सरकारच्या मनात असतं तर ही चर्चा झाली असती. मात्र सरकारला यांचं गांभीर्य नाही. मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही सल कायम राहिल. असेहीअमोलमिटकरीम्हणाले. अशोक खरात व्यक्ती नसून विकृती आहे. जोपर्यंत खरा चेहरा समोर आला नव्हता, तोपर्यंत देव होता. बाबांचा चेहरा समोर आल्यानंतर तक्रारी देऊ लागल्या आहेत. ज्या समाज सुधारकांनी समाज सुधरवण्यासाठीहयातघालवली. त्यासाठी प्रयत्न केले. त्या महाराष्ट्रातआता हे नकली लोक पुढे येत आहेत. तो अशोक खरात आहे म्हणून झाकून घेत आहेत. एका श्वानाचा रंग भगवा असला तर तो साधू होत नाही. असेहीअमोलमिटकरीम्हणाले.
Amol Mitkari : पोट निवडणुक बिनविरोध व्हावी, कुणाला खुमखुमी असेल तर बघावं,
अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत सरकारने एक अध्यादेश काढावा. महाराष्ट्र मारणारी ही पिलावळ आहे. महाराष्ट्र वाचला पाहिजे. शक्ती विधेयकावर मी होतो, लहान मुलीचे बळी दिले गेलेत. महाराष्ट्र टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. महिला आमदारांची संख्या जास्त असती तर दादांचा विषय आवर्जून आला असता. बारामतीकर सुदान आहेत. दादा नसताना काँग्रेसने ही निवडणूक लढवली नसती. पोट निवडणुक बिनविरोध व्हावी, कुणाला खुमखुमी असेल तर बघावं, असेहीआमदारमिटकरीम्हणाले.
Amol Mitkari on Shivsena : शिवसेनेकडून शिकण्यासारखं आहे, शंभूराज देसाईंसाठी शिवसेना एकवटली
तुषार दोषी हे पात्रच वादाचं आहे. अंतरवली सराटीमध्ये काय केलं, हे पात्र इतिहासाला न समजणारे आहे. एक खंत आहे साताऱ्यातील दोन्ही पक्ष पायऱ्यांनंतर आंदोलन करत होते. अजितदादांसाठी हे चित्र दिसलं असतं तर आणखी आवडलं असतं. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो किंवा इतर घटकपक्ष का दादांबद्दल बोलले नाहीत? आज नाही पण 2029 ला जनता माफ करणार नाही. शिवसेनेकडून शिकण्यासारखं आहे, शंभूराज देसाईंसाठी शिवसेना एकवटली. आमच्या नेत्यांनीही निरोप दिलेला असताना आमचे मंत्री, आमदार का आले नाहीत, हा प्रश्नचं आहे. 1 दिवस बाकी आहे. शंभूराज देसाईयांच्यासाठी शिवसेना लढली, आपण दादांसाठी एकत्र येऊया. असेआवाहनदेखीलआमदारअमोलमिटकरींनीयावेळीबोलतानाकेलंआहे.
