पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, त्यावेळी लवकरचं दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल. असं अजित दादा खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबतच्या बैठकीत म्हणाले होते. असा मोठा दावाही लांडेनी केलाय. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना याबाबत कल्पना होती का नव्हती? याबाबत माझ्याकडे माहिती नाही. असं ही लांडेनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे शरद पवार गटाचे नेते हे अजितदादा विलिनीकरणासाठी आग्रही होते, त्यासाठी चर्चा झाली होती असा दावा करत आहेत. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मात्र तसं काही नव्हतं असं सांगत आहेत. त्यावरबोलताना अजित पवारांचे विश्वासू माजी आमदार विलास लांडे यांनीमोठादावाकरतभाष्यकेलंआहे.

Bhandara News : दादांच्या वक्तशीरपणाच्या आठवणीत गहिवरले भंडाराकर

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादांचं अस्थिकलश आज भंडाऱ्यात पोहचलं. भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात त्यांचं अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आलं. यावेळी भंडारा शहरातीलचं नव्हे तर, जिल्ह्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते दादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी पोहचले होतं. यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना दादांनी केलेल्या कामांची आठवण...भंडारा जिल्ह्यात महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणासाठी वेळोवेळी आर्थिक तरतूद करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी घेतलेला पुढाकार...दादांचा वक्तशीरपणा...दादांचा स्पष्टपणा या आठवडणीत भंडाराकर गहिवरून गेलेत. यावेळी भजनाच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी वैनगंगेत अस्थिकलशाचं विसर्जन करण्यात येणार आहे.

NCP Reason Merger Reason : अजित पवारांना विलिनीकरण का करायचं होतं? 

अजित पवार यांना काका शरद पवार यांना सोडून गेल्याचा डाग पुसायचा होता. 

बहिण सुप्रिया सुळे यांच्याशी देखील असलेले नाते कायम ठेवायचे होते. 

शरद पवार यांच्या पक्षाला थेट एनडीएसोबत देखील जाता येत होते. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका बसला असता. मात्र, कुटुंब एक झालं नसतं. त्यामुळे दोन्ही बाजुंनी कुटुंब एक होणं गरजेचं होतं.

अजित पवार यांना पक्ष चालवताना सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची फारशी मदत होत नव्हती. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड असो की विधानसभा निवडणूक असो, अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना फार मदत केली नव्हती. 

ही बातमी वाचा: