Amol Mitkari on Ajit Pawar Death : राज्याचेदिवंगतमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) मोठी शंका उपस्थित केलीय. विमान अपघातावेळी 'तिथं धुकं नव्हतं तर धोका होता', त्यामुळं अजित दादांचा (Ajit Pawar Death) 100 टक्के घात झाल्याचे ते म्हणालेये. जोपर्यंत जिवंत आहो, तोपर्यंत लढा देणार, आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही मिटकरी म्हणालेये. कारण, आज माझं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. लवकरच अजितदादानंतर (Ajit Pawar Death)  त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेणार आहे. यासंदर्भात 'मे' महिन्यात भूमिका जाहीर करणार असल्याचेही मिटकरी (Amol Mitkari) म्हणालेये.

Continues below advertisement

बारामतीत 28 जानेवारी 2026 च्यासकाळच्यासुमारास विमान अपघात झाला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं. अजित पवारांसह (Ajit Pawar Death) पिंकी माळी, विदीप जाधव,  कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील मृत्यू झाला. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला, काल (शनिवारी, ता ३१) अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली, त्यांचा काल शपथविधी पार पडला, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची काल बैठकही झाली आहे, अजित पवारांच्यानिधनानंतर आज पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहून पाच प्रश्नांनी लक्ष देखील वेधलं आहे.

अमोल मिटकरी यांची पोस्ट

Continues below advertisement

अमोल मिटकरी यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहली आहे, त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, "आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले 😢त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.आणि दुसरी – आदरणीय दादांची!!".

"मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे."

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?• सहावी व्यक्ती कुठे गेली?• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.