एक्स्प्लोर

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा

NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा दावा केलाय.

NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत (NCP Merger) सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, “विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता.” या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

NCP Merger: अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरण चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जरी स्वतः शरद पवार यांनी सार्वजनिकपणे विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत.  

Shashikant Shinde: ‘दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले’: शशिकांत शिंदे

साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी नमूद केले आहे की, विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.     

NCP Merger: राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार यांनीच 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल–सुनील तटकरे गटाकडून रोहित पवारांना खुले आव्हान देण्यात आले. त्यावर रोहित पवारांनी, “दादांच्या निधनामुळे आम्ही सध्या संयम बाळगतो आहोत,” असे म्हणत आक्रमक भूमिका टाळल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

NCP Sharad Pawar: तेल ही गेलं आणि तूप ही गेलं हाती राहिलं धुपाटणं...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडलं?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Raj Thackeray: सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
Bomb Threat Vidhan Bhavan मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Raj Thackeray: सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
Embed widget