Vikas Lawande Attack: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे (NCP Leader Vikas Lawande) यांच्यावर काही व्यक्तींनी शाई फेकत त्यांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारकरी संप्रदायातील आणि गोरक्षक असलेल्या तरुणांनी आपल्यावर हा जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप विकास लवांडे (NCP Leader Vikas Lawande)  यांनी केला आहे. या हल्लेखोरांकडं पिस्तूलही होते, असा दावा त्यांनी केला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केली आहे. अशातचया शाहीफेक संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दुसरीकडेयाप्रकरणानेराज्याचेराजकारणतापलंअसतांनाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यावरून दोन मतप्रवाह बघायलामिळालंआहे. माजी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हल्ल्याचा निषेध करण्यातआलाआहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचाकडून लवांडे यांचा बोगस वारकरी म्हणून उल्लेख करण्यातआलाआहे.

Amol Mitkari on Shaifek: नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातत्यांनी पोस्ट करत मिटकरींनी म्हटलं की, "राष्ट्रवादी कांग्रेस (श.पवार साहेबांच्या)पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे एकट्यात गाठून स्वतःला वारकरी म्हणवुन घेणाऱ्या झुंडशाहीने ज्याप्रकारे गुंड शाही केली ती पाहता हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता?“ कुण्याही जीवाचा न घडो मत्सर” व “जो जे वांछील तो ते लाहो” असे वैश्विक पसायदान मागणारे “तुकोबा ज्ञानोबा” अशा धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्या कपाळ करंट्याना मेल्यावरही कळणार नाहीत. निषेध". अशाशब्दातत्यांनीयाप्रकरणावरभाष्यकेलंआहे.

Suraj Chavan on Shaifek: सूरज चव्हाण यांचाकडून लवांडे यांचा बोगस वारकरी म्हणून उल्लेख

तरदुसरीकडे, राष्ट्रवादीचेप्रवक्ते सूरज चव्हाण यांचाकडून लवांडे यांचा बोगस वारकरी म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटलं की, संग्राम भंडारे जेवढे बोगस ह.भ.प आहेत विकास लवांडे सुद्धा तेवढेच बोगस ह.भ.प.आहेत. अशा लोकांमुळे वारकरी सांप्रदाय बदनाम होतोय. सर्वसामान्य जनेतचा विश्वास असेलेल्या वारकरी सांप्रदायला राजकीय अड्डे बनवू नका.विश्वस्ताने दोघांवर पण बंदी आणावी. #जाहीर निषेध, असेहीतेम्हणाले.

इतरमहत्वाच्याबातम्या