मुंबई: आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करुन लोकांना येड्यात काढणारा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) पोलीस यंत्रणेसमोर गुडघ्यावर आल्याचं पाहायला मिळालं. एसआयटी पथकाडून रविवारी भोंदू खरातची 7 तास चौकशी करण्या त आली, तेव्हा मोठमोठ्या बढाया मारणारा भोंदू एक-दोन वेळा क्षीण आवाजात कसेबसे 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' म्हणताना दिसून आला. तसेच, आपल्यात बोलायची ताकदही नसल्याचे त्याने यावेळी म्हटले, त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, राज्यातील दिग्गज नेते, मंत्री, आणि सनदी अधिकारीही या बाबाच्या जाळ्यात आणि भोंदूगिरीत फसल्याचं दिसून आलं. आता, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही खराबद्दलची आप बिती सांगितली आहे.   

Continues below advertisement

नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील खरात फाईल्स एफस्टीन फाईलसच्या पण पुढे आहे. अशोक खरात मला सुद्धा सारखा-सारखा बोलवत होता. एकदा तर मी शहापूरपर्यंत गेलो होतो. पण, माझ नशीब चांगलं, मंत्रालयातून फोन आला आणि मधूनच मी माघारी आलो. लोकं खूप कौतुक करायचे म्हणून मी पाहायला जाणार होतो, अशी आप बिती आमदार आव्हाड यांनी आज सांगितली. तसेच, नशीब हा खरात आहे, खान असता तर गोंधळ उडाला असता असेही आव्हाड यांनी म्हटले. मी खरातच्या पायाच पडणार आहे, हा साधे चिंचुके पॉलिश करुन अंगठीमध्ये घालायचा आणि त्याचे 1 लाख रुपये घ्यायचा. मी चाकणकर यांच्यावर बोलणार नाही पण उगाच का काही घडतं? जयंत पाटील, निलेश लंके काय सगळ्यांचेच फोटो आहेत, असेही आव्हाड यांनी म्हटले. 

नकली साप आणि वाघाचे कातडे

भोंदू आणि विकृत अशोक खरात याच्या अघोरी कारवायांचा भांडाफोड त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच झाला आहे. खरातच्या स्त्री लंपटपणाविषयी तक्रारी कानावर येऊ लागल्यानंतर त्याचा संशय बळावला. त्याने बाबाच्या दालनात स्पाय कॅम बसवले आणि त्यात बाबाचे चाळे कैद केल्याचे समोर येत आहे. हा प्रकार कळल्यानंतर खरातने त्याला जीवे मारण्याच्य धमक्या दिल्या व त्याने संबंधित पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आरोपी खरात नकली साप व वाघाचे कातडे वापरून लोकांमध्ये भीती निर्माण करत असे. रिमोटवर चालणारा हा साप हालताना दिसल्यावर उपायांसाठी येणाऱ्यांना अदभूत वाटत असे, तर वाघाचे कातडे असल्यानेही लोक त्याच्या अघोरी विद्येला घाबरत होते.

Continues below advertisement

हेही वाचा

साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप