मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन खातेवाटप झाले, तेव्हा अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले होते. मात्र, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या एका दुर्दैवी आणि भीषण विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळापर्यंत हे अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले होते. परंतु, अजित पवारांच्या निधनाला आता जवळपास चार महिने होत आले तरीही हे महत्त्वाचे खाते अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परत देण्यात आलेले नाही. लवकरच पावसाळी अधिवेशन सुरू होणार तत्पूर्वी अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.
NCP Ajit Pawar : पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होणार?
राज्याचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी हे अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परत मिळणार का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखात्याची २ महिन्यानंतर अद्याप प्रतिक्षाच असल्याचं समोर आलं आहे. महायुतीमधे खातेवाटप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अर्थखातं आल होतं, मात्र, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापर्यंत हे खात मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवल होतं आणि अद्याप ही हे खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेलं नाही.
NCP Ajit Pawar : विधान परिषदेच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात धुसफूस
विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटणार असल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी, तर नाशिक व संभाजीनगरवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे
विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित दोन तास विधान परिषदेच्या जागा वाटपात संदर्भात चर्चा झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक करून निघाले. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याकरिता सुवर्ण मध्य साधण्यासाठी रवींद्र चव्हाण व मंत्री बावनकुळे त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
