Akola News : एकीकडे अकोल्यात राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपची (BJP) संयुक्त बैठक आजहोतआहे. मंत्री इंद्रनील नाईक (Indranil Naik) आणि भाजप आमदार रणधीर सावरकरांच्या (Randhir Sawarkar) उपस्थित हि बैठक पारपडतआहे. त्यामुळे अकोल्यात महायुतीतला जागा वाटपाचा तिढा आज सुटणार असल्याचीशक्यताआहे. तरदुसरीकडे अकोल्यात (Akola News) महायुतीच्या जागांसंदर्भात महत्वाची चर्चा होत असतांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा (Amol Mitkari) मात्र वेगळा सुर दिसूनआलाय.

Continues below advertisement

अकोला महापालिकेत महायुतीत फक्त 10-15 जागा मिळणार असेल तर स्वबळावर लढण्याचा इशारा अजितपवारगटाचेआमदारअमोल मिटकरींनीदिलाय. दरम्यान या आशयाचं ट्वीट मिटकरींनीकेलंय. अकोल्यात भाजप 55, शिंदे सेना 15 आणि राष्ट्रवादी 10 असं जागा वाटप होण्याची शक्यता आहे. आज भाजप जागा वाटपावर चर्चा करायला येतायेत. यावेळी राष्ट्रवादीचे प्रभारी इंद्रनील नाईक यांच्याप्रमुखउपस्थितीभाजपआणि राष्ट्रवादीचीबैठकहोतआहे. मात्र अकोल्यात राष्ट्रवादीच्या चर्चेतून अमोल मिटकरींना स्थानिक नेतृत्वाने दूरठेवल्याचीचर्चाआहे. परिणामी मिटकरी हे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेयाबैठकीतनेमकाकायतोडगानिघतोहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

NCP BJP Meeting : भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

Continues below advertisement

अकोल्यात आज भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संयुक्त बैठक पार पडणार आहे. अकोल्यातल्या आरजी हॉटेलला ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री इंद्रनील नाईक आणि विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांची ही संयुक्त बैठक असणारे. या बैठकीला अकोल्यातील राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणारे आहे. अकोला महापालिकेत महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीलासोबत घेण्याचे संकेत आहेत. तरअकोला महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक असणार आहे. या बैठकीतच आज राष्ट्रवादी आणि भाजपचा जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, अकोल्यातल्या काही जागांवर महायुतीत तिढा आहे. मात्र, दुपारनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे संकेत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक आटोपल्यानंतर मंत्री नाईक यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे.

Akola Mahayuti Seat Sharing : सायंकाळपर्यंत महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार?

दरम्यान, अकोल्यात महायुतीत भाजप 55, शिंदेसेना 15 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागा लढण्याची शक्यता आहे. मात्र, आज सायंकाळपर्यंत महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचे बोलल्या जातेय. तर उद्यापर्यंत महायुती उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.

हेहिवाचा