NCP Ajit Pawar Group Candidate Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)

Continues below advertisement

विधान परिषेदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील विविध पक्षातील इच्छुकांची नावं समोर येत आहे. याचदरम्यान, विधान परिषद निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे (Ajit Pawar NCP Vidhan Parishad Election 2026) एक जागा आहे. मात्र विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेसाठी इच्छुकांमधे झिशान सिद्धकी, उमेश पाटील, संजय दौंड, सुरेखा ठाकरे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, राजेंद्र जैन हे इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) नेमकी कुणाला संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (NCP Ajit Pawar Group Candidate Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषद निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कोणकोण इच्छुक? (NCP Ajit Pawar Group Candidate Vidhan Parishad Election 2026)

  • झिशान सिद्धिकी
  • उमेश पाटील
  • संजय दौंड
  • सुरेखा ठाकरे
  • आनंद परांजपे
  • सुरेश बिराजदार
  • राजेंद्र जैन

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

Continues below advertisement

विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
  • नीलम गोऱ्हे (शिवसेना)
  • शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
  • अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
  • गोपीचंद पडळकर (भाजप)
  • रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
  • राजेश राठोड (काँग्रेस)
  • प्रवीण दटके (भाजप)
  • रमेश कराड (भाजप)

विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)

  • प्रज्ञा सातव

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 

संबंधित बातमी:

Shiv Sena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?