NCP Ajit Pawar: राज्याचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महायुती सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेले आणि अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते (Ministry of Finance and Planning) पावसाळी अधिवेशनापूर्वी (Monsoon session) राष्ट्रवादीला (NCP) परत मिळणार का? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनाला चार महिने उलटून गेले तरी अद्याप या खात्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे चित्र आहे.

Continues below advertisement

NCP Ajit Pawar: अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर खाते मुख्यमंत्र्यांकडे

राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होऊन जेव्हा खातेवाटप झाले, तेव्हा महत्त्वाचे असलेले अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले होते आणि दिवंगत अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून धुरा सांभाळत होते. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात (Airplane Crash) अजित पवार यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) काळापर्यंत हे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतःकडे ठेवले होते. परंतु, अधिवेशन संपूनही हे महत्त्वाचे खाते अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परत देण्यात आलेले नाही.

NCP Ajit Pawar: भाजपने दिले होते 7 दिवसांचे आश्वासन?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अवघ्या सात दिवसांत हे अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुपूर्द करण्यात येईल, असे आश्वासन भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेतृत्वाने राष्ट्रवादीला दिले होते. मात्र, या आश्वासनाला अनेक दिवस उलटून गेले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खात्याची अद्याप प्रतीक्षाच आहे.

Continues below advertisement

NCP Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विचारणा

नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अर्थ खात्याबाबत थेट विचारणा केली. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही सकारात्मक हालचाल किंवा निर्णय झालेला नाही. जर हे अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यात आले नाही, तर पक्षाची पुढील भूमिका काय असेल? किंवा त्यांना इतर कोणते महत्त्वाचे खाते दिले जाणार का? याबाबतही महायुतीमध्ये अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असल्याने, त्यापूर्वी या महत्त्वपूर्ण खात्याचा तिढा सुटणार की महायुतीमधील अंतर्गत अस्वस्थता वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal-Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: छगन भुजबळांची 1 अट, दिल्लीचा आदेश आणि राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी; राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?