Continues below advertisement

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्येमुंबईनंतर पुणे (Pune) महापालिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातच येथे थेट सामना होत आहे. तर, शिवसेना शिंदे गटही येथे भाजपविरुद्ध मैदानात उतरल्याचं दिसून येतं. त्यामुळे, पुणे आणि पिंपरीचिंचवड महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठमोठीआश्वासनं दिली जात आहेत. विशेष म्हणजे आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये, महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो मोफत करणार अशी भलीमोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी केली. त्यामुळे, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, मेट्रो (Metro) मोफत करण्याचा अधिकार महापालिकेला आहे का, यासह अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे पुणेकरांचेपेट्रोलच्यास्वरूपात दररोज साडे सात कोटी रुपये वाया जातात. अशाप्रकारे वर्षाला दहा हजार आठशे कोटी रुपयेपेट्रोलच्यास्वरूपात वाया जातात. त्यामुळे ते पैसे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरता येतील, असा मोठा प्लॅन अजित पवारांनी सांगितला आहे. त्यामुळे, पुण्यात मोफत मेट्रो शक्य आहे का?यासह पुणे मेट्रोबाबत विविध प्रश्नांची माहिती खालील लेखातून देण्यात आली आहे.

Continues below advertisement

पुणे मेट्रो माहिती

1. पुण्यात मेट्रोचे दोन मार्ग सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी.

2. पुण्यात मेट्रोचे आणखी ४ ते ५ मार्ग प्रस्तावित आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मार्ग खडकवासला ते खराडी हा आहे. त्याशिवाय सध्याच्या मार्गांचा विस्तार जसे की, पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि स्वारगेट ते कात्रज हे मार्ग प्रस्तावित आहेत. याशिवाय, एसएनडीटी-वारजे-माणिकबाग आणि हडपसर ते लोणी-काळभोरहडपसर ते सासवड रोड असे आणखी दोन मार्ग होणार आहेत. या सर्व मार्गांसाठी जवळपास ३० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

3. पुण्यातील मेट्रोची प्रवासी संख्या सध्या साधारणतः दोन ते सव्वादोन लाखांच्या दरम्यान आहे. माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्च 2026 पर्यंत सुरू झाल्यास ही संख्या आणखी वाढेल.

5. प्रवासी तिकीटातून मेट्रोला दर महिन्याला अंदाजे १० ते १२ कोटी रुपये मिळतात. गेल्या वर्षभरात २०२५ मध्ये मेट्रोला तिकीटातून १०५ कोटी रुपये प्राप्त झाले होते.

6. मोफत प्रवासाचा निर्णय पुणे महापालिका घेऊ शकत नाही. घेतला, तरी तो अंतिम मान्यतेसाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठवावा लागणार आहे. मेट्रो चालविणाऱ्यामहामेट्रोच्या संचालक मंडळात त्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. (देशात एकही मेट्रो सेवा मोफत चालवली जात नाही.)

7. गणेशोत्सवामध्ये दिवसाला सहा लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, तर मेट्रोची यंत्रणा काहीशी कमी पडली होती. मोफत प्रवास उपलब्ध करून दिल्यास गर्दी प्रचंड वाढेल, स्वच्छता राखता येणार नाही. मेट्रोकडे वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी सध्या पुरेशाट्रेन नाहीत.

पुणे पीएमपी - पुण्यात पीएमपीचे किती मार्ग सुरु आहेत?

- 381

पुण्यात सध्या किती प्रवासी प्रवास करतात?

- दररोज - सरासरी- ९,८५,८४९

- मासिक - सरासरी - ३३७३३२००

- वार्षिक - सरासरी - ४१०७८५६००

सध्या सुरु असलेली चालवण्यासाठी किती खर्च आहे?

- महिना - सुमारे १११ ते ११२ कोटी

प्रवाशांच्यातिकीटातून किती पैसे मिळतात?

- दीड ते दोन कोटींच्या घरात

मोफत प्रवास दिल्यास वाढणारी गर्दी सहन होईल का?मेट्रोची यंत्रणा गर्दी कशी हाताळेल?

- पुणे पिंपरीचिंचवड आणि पीएमआरडी एकत्र लोकसंख्या पाहता, सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार सहा ते सात हजार बस संख्या आवश्यक आहे.

हेही वाचा

अजितदादांची लाडकी बहीण योजनेला मागे टाकणारी घोषणा, पुणेकरांना मेट्रो, बस प्रवास मोफत, जाहीरनाम्यातलं गेमचेंजर आश्वासन