Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणांच्या नावाची चर्चाही सुरु होती. यासाठी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha) राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीकडून राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. राज्यसभेसाठी एका अपक्षाचा अर्ज दाखल झाला असून तो अवैध ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच राजेंद्र जैन यांची निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीची राज्यसभेतील हीच एक जागा सध्या रिक्त झाली होती.
राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नावाची चर्चाही सुरु होती. यासाठी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. परंतु शेवटी राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आता नवनीत राणा यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करुन राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला, याबाबत माहिती दिली. आधुनिक भारताची उभारणी करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्भीड व कणखर गृहमंत्री अमित शाह व महाराष्ट्राचे कार्यसम्राट व जननायक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे. करिता मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिक पणे करीत राहील. आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांना राज्यसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्याबाबत विनंती केली होती, मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झाले नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या. (Navneet Rana On Rajya Sabha Election 2026)
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी नवनीत राणांना कोणती अट घातली? (Navneet Rana On Sunetra Pawar)
सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरीदेखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार व पार्थदादा पवार यांची आभारी आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
- नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
- मतदानाची तारीख (Date of Poll): 18 जून 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
- मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?






















