गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गिते ह्या 37 वर्षीय तरुणाने भाजप-शिवसेनेचे संकटमोचक असणारे मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह महायुती ला पुरते जेरिस आणले आहे.

नाशिक : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत (Vidhanparishad) 17 पैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध केल्या आहेत. त्यामुळे, येथील जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून कोकणात अनिकेत तटकरे तर पुण्यात विक्रम काकडेंची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, नाशिकच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, येथील जागा महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आली आहे. मात्र, भाजपच्या गोकुळ गिते यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय. येथे बहुमत असणाऱ्या महायुतीचे तीन मंत्री एका अपक्ष उमेदवारच्या माघारीसाठी दोन-तीन दिवस नाशिकमध्ये (Nashik) तळ ठोकून असल्याने महायुतीच्या नेत्यांना आपल्या मतदारांवर विश्वास नाही का? एका अपक्ष उमेदवाराची एवढी धास्ती का? असा सवाल उपस्थित होत आहे.
गोकुळ गिते ह्या 37 वर्षीय तरुणाने भाजप-शिवसेनेचे संकटमोचक असणारे मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह महायुती ला पुरते जेरिस आणले आहे. आपल्या विभागाचा कारभार सोडून हे तिन्ही मंत्री आधी प्रसाद हिरे आणि आणि त्यांनतर गोकुळ गिते यांच्या निवडणुकीतील माघारीसाठी अक्षरशः विनवणी करत आहेत. नाशिकमध्ये येताना उत्साह आणि आत्मविश्वासाने येणारे मंत्री जाताना मात्र निराशेने रिकाम्या हाताने माघारी जात आहेत. माघारीच्या दिवसापासून नेत्यांच्या ह्या जोर बैठका सुरू आहेत, अद्यापही पण तोडगा काही निघत नाही. मुळात महायुतीकडे 623 पैकी 468 मतदार असूनही नेत्यांना निवडणुकीची एवढी धास्ती का वाटते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मंत्री मात्र कार्यकर्ता दुरावला जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगत मंत्री वेळ मारून नेत आहेंत
नाशिकमध्ये येताच मंत्र्यांनी थेट विमानतळावर गोकुळ गीतेंची भेट घेतली, पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. जिथे मंत्री अपयशी ठरले तिथे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी आज गोकुळ गितेंचे बंधू गणेश गिते यांची भेट घेतली. गणेश गिते यांच्यां पत्नी भाजपा नगरसेविका दीपाली गिते यांचे मत मागण्यांसाठी आल्याचे न कारण पुढे करत तेही माघारी फिरले. तर, गोकुळ गीतेच्या उमेदवारीचा आणि मंत्री गिरीश महाजन यांचा काही सबंध नसल्याचा दावाही किशोर दराडे यांच्याकडून केला जात आहे.
शिवसेना नेत्यांची नाराजी, महाजनांकडे संशयाची सुई
गिते बंधू मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे, त्यामुळे महाजन यांच्यां समोरील अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे गिते माघार घेत नाहीत दुसरीकडे गीतेच्या उमेदवारीवरून महाजन यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. महाजन यांच्यां सांगण्यामुळेच गीतेंनी अर्ज भरला होता का अशी शंका महायुतीच्या गोटात उपस्थित होत आहे. त्यामुळे, कालपर्यत बडखोरांच्या माघारीसाठी शिवसेना भाजपचे नेते एकत्र प्रयत्न करत होते. मात्र, आता थेट शिवसेनेचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे, गीतेच्या उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ





















