एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2026: नाशकात बंडखोरांचे बंड, महायुतीत वादाची ठिणगी! गोकुळ गीते मनधरणीनंतरही निर्णयावर ठाम, निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजनांकडे संशयाची सुई?  

Nashik Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेत नाशिकच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti Alliance) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोकुळ गिते अजूनही निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदे नाशिकच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti Alliance) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण नाशिकच्या जागेवर बंडखोरी करणाऱ्या गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दोन्हीं मंत्री तीन दिवसापासून नाशिकमधे तळ ठोकून होते. काल त्यांच्या जोडीला मंत्री दादा भुसे देखील होते. तिन्ही महत्वाचे मंत्री आपल्या विभागाचा कारभार सोडुन बडखोरांची मनधरणी करण्यात व्यस्त होते. त्यात अल्पसं यश आलं खरं आणि प्रसाद हिरे यांनी माघार घेतली. मात्र गोकुळ गिते अजूनही निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून आहे.

दरम्यान, रात्रीपर्यंत गोकुळ यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आधी मंत्री गिरीश महाजन आणि नंतर उदय सामंत, दादा भूसे याचीही गोकुळ गिते यांच्यासोबत चर्चा झाली. तरीही अपयश आल्यानं आज महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे, गणेश गिते यांच्या भेटीसाठी आले आहेत.

Mahayuti : एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संशयाची सुई

अशातच, कालपर्यंत उदय सामंत, गिरीश महाजन दोघेही प्रयत्न करत होते. मात्र आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याची शक्यता असून गितेच्या उमेदवारीमुळे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संशय्याची सुई आहे. गिते बंधू महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने महाजन याच्या सांगण्यावरून उमेदवारी आहे का? गिते हे महाजन यांचेही का ऐकत नाही? असा सवालही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.

Gokul Gite : मतदारांचा कौल बाघता नकार दिला तर तो मतदारांसोबतच घात असेल

दरम्यान, गोकुळ गीते यांच्या समजूतीसाठी आलेल्या उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात अपयश आले आहे. आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा गोकुळ गीते यांची महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे वरिष्ठ नेते गिरीश महाजनांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी भेटीसाठी बोलावलं. यावेळी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांची भेट घेऊन यावेळी चर्चा केली. या चर्चे दरम्यान असं कळलं कि प्रसाद हिरेंनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तास पाठिंबा आपण देखील देऊ शकतो का? असं विचारण्यात आलं. मात्र मी स्पष्टपणे नकार दिला. मतदारांचा कौल बाघता नकार दिला तर तो मतदारांसोबतच घात असेल. असेही गोकुळ गीते म्हणाले.

Who is Gokul Gite?: कोण आहेत गोकुळ गीते?

गणेश गीते यांनी माघार घेतली असली, तरी गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे.

- गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे भाऊ आहेत.

- गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे.

- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते.

- गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत, तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget