Nashik: भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना पाठिंबा; मात्र गोकुळ गीते निर्णयावर ठाम; नाशिक विधानपरिषेदेत महायुतीतच गीते विरुद्ध दराडे सामना रंगणार!
Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना गोकुळ गीते यांची निवडणुकीतून माघार घेण्यास नकार नाशिकच्या निवडणुकीत गीते विरुद्ध दराडे सामना रंगणार आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिक (Nashik News) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीला (Mahayuti) मोठा हादरा बसला असून, बंडखोरीचे वादळ शमवण्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना अपयश आले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर, गोकुळ गीते यांची निवडणुकीतून माघार घेण्यास नकार नाशिकच्या निवडणुकीत गीते विरुद्ध दराडे सामना रंगणार.
Gokul Gite : मतदारांचा कौल बाघता नकार दिला तर तो मतदारांसोबतच घात असेल
दरम्यान, गोकुळ गीते यांच्या समजूतीसाठी आलेल्या उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात अपयश आले आहे. आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा गोकुळ गीते यांची महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे वरिष्ठ नेते गिरीश महाजनांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी भेटीसाठी बोलावलं. यावेळी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांची भेट घेऊन यावेळी चर्चा केली. या चर्चे दरम्यान असं कळलं कि प्रसाद हिरेंनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तास पाठिंबा आपण देखील देऊ शकतो का? असं विचारण्यात आलं. मात्र मी स्पष्टपणे नकार दिला. मतदारांचा कौल बाघता नकार दिला तर तो मतदारांसोबतच घात असेल. असेही गोकुळ गीते म्हणाले.
Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकनंतर जळगावचा तिढा सुटणार?
दरम्यान, नाशिकमधील बंडखोरीच्या माघारीवरच जळगाव निवडणुकीचा तिढा अवलंबून आहे. जळगावमध्ये संख्याबळाच्या आधारे सहज विजयाचा दावा करणाऱ्या भाजपची चिंता अजूनही कायम आहे. येथे भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. काळे यांची समजूत काढण्यासाठी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, मात्र त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्यामुळे, जळगावातही या अंतर्गत बंडखोरीचा (Rebellion) तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. दुसरीकडे, नाशिकमधील दुसरे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते सध्या पेठ तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत असून, त्यांच्यासोबतही फोनवर चर्चा सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम






















