एक्स्प्लोर

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमध्ये महायुतीला मोठे यश! भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा; संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केलाय.

Nashik Vidhan Parishad Election 2026: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने आता एक अत्यंत मोठे वळण घेतले आहे. अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आपली माघार जाहीर केली आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

आज सोमवारी नाट्यमय घडामोडी घडत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे थेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे देखील उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे महायुतीसमोरील एक मोठा अडथळा दूर झाला आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया 

प्रसाद हिरे यांच्या माघारीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमचे दोन्ही उमेदवार मागे घेणार हे सुरुवातीपासून सांगत होतो. प्रसाद हिरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे त्यांनी आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. नाशिकचा प्रश्न मिटला की जळगावचा प्रश्न सुटेल. गोकुळ गिते यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरू आहे, सायंकाळी निर्णय होईल. विधान परिषद निवडणुकीच्या 17 पैकी 17 जागा महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकनंतर जळगावचा तिढा सुटणार?

दरम्यान, नाशिकमधील बंडखोरीच्या माघारीवरच जळगाव निवडणुकीचा तिढा अवलंबून आहे. जळगावमध्ये संख्याबळाच्या आधारे सहज विजयाचा दावा करणाऱ्या भाजपची चिंता अजूनही कायम आहे. येथे भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.  काळे यांची समजूत काढण्यासाठी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, मात्र त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्यामुळे, जळगावातही या अंतर्गत बंडखोरीचा (Rebellion) तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. दुसरीकडे, नाशिकमधील दुसरे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते सध्या पेठ तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत असून, त्यांच्यासोबतही फोनवर चर्चा सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'
राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Embed widget