एक्स्प्लोर

Nashik Election 2026: नाराजीनाट्यानंतर देवयानी फरांदे मैदानात, मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं; दिनकर पाटलांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल, अजय बोरस्तेंनीही शड्डू ठोकला!

Nashik Election 2026: महायुतीकडून जागावाटप किंवा युती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहे.

Nashik Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Election 2026) पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच, भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई सुरू झाल्याचं चित्र आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तर नुकेतच मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी देखील निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय. 

Devyani Pharande आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे मैदानात

भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे या सहकुटुंब पश्चिम विभागीय कार्यालयात दाखल झाल्या. विशेष म्हणजे, भाजपमधील प्रवेश आणि नाराजीनाट्यानंतरही फरांदे कुटुंबाने थेट अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

यावेळी देवयानी फरांदे म्हणाल्या, “अजिंक्य निवडणूक लढवत असल्यामुळे मी संपूर्ण कुटुंबासह त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पहाटेपर्यंत चर्चा झाली असून, युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल. मात्र माझी एकच भूमिका आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा. किमान दोन निष्ठावंत उमेदवारांना संधी मिळावी, हीच माझी मागणी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Dinkar Patil: दिनकर पाटील यांचा भाजपकडून अर्ज 

दरम्यान, दिनकर पाटील यांनी देखील भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मनसेमध्ये असताना त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. ठाकरे गट–मनसे युती जाहीर होताच दिनकर पाटील यांनी जल्लोष साजरा केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात या भूमिकेवरून उलटसुलट चर्चा रंगत आहेत.

Seema Hiray: सीमा हिरे यांच्या दिराचा अर्ज 

नाशिकमध्ये आणखी एक लक्षवेधी घडामोड म्हणजे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या दिराचा, माजी नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. सीमा हिरे यांच्या समर्थकांनी यावेळी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले. महायुतीचा निर्णय प्रलंबित असतानाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अंतर्गत राजकारण तापल्याचं चित्र आहे.

Ajay Boraste: शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते आक्रमक

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अजय बोरस्ते म्हणाले, युती संदर्भात आम्ही, महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि नाशिकची जनता संभ्रमात आहे. भाजप युतीबाबत गुळणा धरून बसली आहे. आमदार आणि खासदार हे कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून येतात, पण आज दुर्दैवाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा आहे. युती होणार असेल तर भाजपने स्पष्ट सांगावं. नाही होणार असेल तरीही स्पष्ट सांगावं. शिवसेना निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. शिवसेनेला फेटाळलं गेलं तर आम्ही ताकदीने मैदानात उतरू, असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिलाय. 

Vilas Shinde: विलास शिंदेंचे शक्तीप्रदर्शन

तर ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेले विलास शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युतीची घोषणा अद्याप झालेली नसताना शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विलास शिंदे यांनी बाईक रॅली काढत नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ 

आणखी वाचा 

Video: मी नाराज नाही, पण...; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या

महत्त्वाच्या बातम्या

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget