Nashik Crime Ravindra Erande news: महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला कथित नराधम पत्रकार रवींद्र एरंडे याची गुरुवारी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) आपल्या खास शैलीत चौकशी केली. गोरगरीब महिलांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ बनविणाऱ्या विकृत एरंडे याने महिला अत्याचाराचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. सुरुवातीला पोलीस कोठडीत असणारा रवींद्र एरंडे (Ravindra Erande) तपासात पोलिसांना सहकार्य करत नव्हता. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच हात जोडून त्याने 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाचा नारा' दिला. शहरातील नामचीन गुंडांना (Criminals) त्यांची जागा दाखवून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण करणयासाठी नाशिक पोलिसांनी आपला वेगळा पॅटर्न सुरू केला आहे. त्याअंतर्गत रवींद्र एरंडे याचा पोलिसांनी पाहुणचार करताच संशयित आरोपीला नाशिक जिल्हा कायदा बालेकिल्ला आठवला. याआधी भोंदू अशोक खरात याला कायद्याच्या बालेकिल्ला आठवला होता. त्यानंतर आता रवींद्र एरंडे याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Nashik Latest news)
कालच्या चौकशीनंतर रवींद्र एरंडे हा जेव्हा क्राइम ब्रांचच्या कार्यालयातून बाहेर पडला तेव्हा तो लंगडत चालत होता. लंगडत चालताना तो हा जोडून 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' हे नाशिक पोलिसांचे अलीकडच्या काळात लोकप्रिय ब्रीदवाक्य सातत्याने उच्चारत होता. यापूर्वी एसआयटीने नाशिकमधील भोंदूबाबा याचीही अशाचप्रकारे कसून चौकशी केली होती. अशोक खरात हादेखील पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला कोठडीत चांगलाच चोपला होता. यानंतर बाहेर पडताना अशोक खरात याच्या पायात चालायचे त्राणही शिल्लक राहिले नव्हते. तशाच गलितगात्र अवस्थेत तो 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' हे वाक्य कसेबसे पुटपटत गाडीत बसला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी रवींद्र एरंडे याचीही तीच गत केल्याची चर्चा आहे.
Nashik Crime News: एरंडे स्वत:च रचलेल्या जाळ्यात कसा सापडला?
हे प्रकरण अत्यंत नाट्यमयरीत्या उघडकीस आले होते. काही दिवसांपूर्वी रवींद्र एरंडे याने स्वतः सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, चार जण त्याला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 12 लाख रुपयांची खंडणी मागत आहेत. पोलिसांनी या चार जणांना अटक केली खरी, मात्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले. एरंडेच्या टॅबमध्ये तब्बल 87 अश्लील व्हिडिओ सापडले होते. पोलिसांनी एरंडेच्या ताब्यातून 4 मोबाईल, 2 पेनड्राइव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केले आहे. तसेच त्याच्या ऑफिसवर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. या मोबाईलमधील डिलीट केलेला डाटा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे. आरोपीने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते. यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
आणखी वाचा
