Nana Patole : नाशिमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशोक खरात प्रकरणी उद्या आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. खरात प्रकरणी राज्य सरकारनं खुलासा केला पाहिजे. महिला असल्यानं रुपाली चाकणकरांना टार्गेट केल्या जातंय का? मंत्र्यांचे ही राजीनामे घेतील का? असा सवाल पटोलेंनी केला आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला. 

Continues below advertisement

रुपाली चाकणकर एक महिला असल्याने त्यांना टार्गेट केलं जातंय का? 

रुपाली चाकणकर एक महिला असल्याने त्यांना टार्गेट केलं जात आहे का? खरात त्यांच्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई होणार का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. मंत्रीच नाहीतर खरातच्या प्रकरणामध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्पोट नाना पटोले यांनी केला आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी नाशिकचाच मुद्दा घेतला होता. आता खरात कोण आहे, ते समोर आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असताना त्यांनी सांगितली होती, अशी कुठलीही घटना घडली नाही. खरात नव्हे तर, नाशिकमध्ये आणखी एक आहे ज्यामध्ये काही अधिकारी, मंत्री सुद्धा सहभागी आहेत. ज्या नाशिकमध्ये महाकुंभ होत आहे तिथं अशी घटना घडते आणि यात महाराष्ट्र बदनाम होत असल्याचे पटोले म्हणाले.

मागच्या वेळेस मी विधानसभेत पेनड्राईव्ह दिला होता. मात्र, तो मुख्यमंत्र्यांनी का लपवला? प्रकरण तेव्हाच उघडकीस आले असते. या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी तीन दिवसातच एसटी स्थापन केली. एसटीची मागणी कुणीही केलेली नसताना राज्य सरकारने एसटी स्थापन का केली? या संपूर्ण प्रकरणातच्या संदर्भात आम्ही उद्या विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणून राज्य सरकारला खुलासा मागणार आहोत. राजीनामा वेळ आली तर सरकारला या प्रकरणात राजीनामा सुद्धा द्यावा, लागेल असा थेट निशाणा नाना पटोलेंनी लगावला.

Continues below advertisement