Narhari Zirwal मुंबई: राज्याचे मंत्री आणिराष्ट्रवादीअजितपवारगटाचेनेते नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Narhari Zirwal Case) तरदुसरीकडे झिरवळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी मंत्री झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याचीमाहितीआहे.
Narhari Zirwal : मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थीती, मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली अध्यक्षांकडे स्वतःची बाजू
मिळालेल्यामाहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी स्वतःची बाजू पक्षाच्या अध्यक्षांकडे मांडली आहे. याप्रकरणात माझी काहीही चूक नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलं असल्याची माहितीमंत्री झिरवळ यांनीदिलीअसल्याची माहिती आहे. आज पारपडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला झिरवळ यांचीअनुपस्थीतीहोती. मात्र पक्षाच्या पुढील आठवड्यातील बैठकीत ते उपस्थित राहून आपली बाजू मांडणार, अशीदेखीलमाहितीआहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत आतानेमका काय निर्णय होईल? हेपाहणंमहत्वाचंठरणारआहे.
Crime News : अन्न व औषध प्रशासनात नोकरी लावण्याची मागणी, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
दुसरीकडे, मंत्री नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) मध्ये नोकरी लावण्याची मागणी केल्याचा, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंया एफआयआरमध्ये आरोप करण्यातआलेआहे. व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी एडिट केल्याचा देखील आरोप यावेळीकरण्यातआलाआहे. सोबतच भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 आणि 351(1) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. सध्या कफ परेड पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यातआलीअसूनयाप्रकरणीपुढेनेमकंकायहोतंहेपाहणंमहत्वाचंठरणारआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
