Narendra Bhondekar: पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खास विश्वासू परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या दरम्यान शाब्दिकवाददिवसागणिकवाढतचअसल्याचेचित्रआहे. अशातचआतायाशाब्दिकचकमिकेनेटोकगाठल्याचीचर्चाआहे. परिणामी पूर्व विदर्भात महायुतीतील संघर्ष शिगेलागेल्याचे चित्र आहे.भंडारा येथील शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करतांना देवेंद्र फडणवीस हे आमच्या मतांमुळे मुख्यमंत्री झाले. मात्र भाजपपेक्षा काँग्रेस बरी होती, अशी टीका शिवसेनेचेआमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी केली होती. तर त्याला आता परिणय फुके यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

Narendra Bhondekar: नरेंद्र भोंडेकर यांची लायकी नाही कि त्यांनी मुख्यमंत्र्यावरटीकाकरावी

नरेंद्र भोंडेकर यांची लायकी नाही कि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करावी. नरेंद्र भोंडेकर भाजपच्या जोरावर आमदार झाले आहे. मात्र त्यांना गैरसमज झाला. त्यांनी आत्मचिंतन करावे असे परिणय फुके म्हणाले . भोंडेकर काँग्रेसच्या वाटेवर दिसत आहे. त्यामुळे ते काँग्रेसची स्तुती करत असून काँग्रेसकडून भ्रष्ट्राचार करणे शिकले, असा टोला देखील फुके यांनी भोंडेकरांना लगावला. मात्र पूर्व विदर्भात शिवसेनेने 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्ष उभे केले, मात्र 80 टक्के जागा आम्ही जिंकू उर्वरित 20 टक्क्यात इतर सर्व पक्ष असेल, असा दावा देखील परिणय फुके यांनी केला. शिवसेनेनं रवींद्र चव्हाण यांना किती पण घेरण्याचा प्रयत्न केला तरी रवींद्र चव्हाण मोठे नेते आहे. ते चक्रव्युव भेदण्याची क्षमता देवतात असे देखील फुके यांनी सांगितले.

गोंदिया नगरपरिषद हद्दीतील 3 प्रभागातील निवडणूक  पुढे ढकलण्यात आली....

गोंदियानगर परिषद येथील निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून 2 तारखेला मतदान होणार आहे... मात्र दोन दिवसांपूर्वीच गोंदिया नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16 यामधील एका एका जागेच्या निवडणूकिला स्थगिती दिली आहे... गोंदिया शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील सर्वसाधारण ब, वॉर्ड क्रमांक 11 मधील सर्वसाधारण ब आणि वार्ड क्रमांक 16 मधील सर्व साधारण अ या गटातील निवडणूक पुढे ढकलण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. तीन वार्डातील नगरसेवक उमेदवारांची हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या