दिल्ली : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) थेट इशाराच दिला होता. त्यावरुन, आता राणे आणि महाजन आमने-सामने आले आहेत. पुन्हा आमच्या विरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी दिला. त्यानंतर प्रकाश महाजन चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलनाला सुरुवात केली आहे. नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला, असे म्हणत महाजनांनी जोरदार हल्लाबोल केला होता. प्रकाश महाजन यांच्याबद्दल नितेश राणेंना (Nitesh Rane) प्रश्न विचारला असता, ते कोण? मी फक्त स्वर्गीय प्रमोद महाजन यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो. मी बाकी चिरीमिरींना ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री त्यांनी दिली होती. त्यानंतर, आता खासदार नारायण राणे यांनी देखील प्रकाश महाजनांना (Prakash mahajan) महत्त्व देत नसल्याचे म्हटले. 

मी त्यांना महत्व देत नाही, ⁠त्यांना माझ्यावर टीका करून प्रसिद्धी मिळत असेल तर मी त्यांना संधी देणार नाही. त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही, ते जिथे असतील तिथे मी पोहचेन. दम असेल तर येऊ दे, दोन्ही एकत्र येऊ द्या अशा शब्दात नारायण राणेंनी पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांना इशारा दिला आहे. तसेच, उलट्याचा अर्थ तुला माहितीय का, एकटा भेट, सांगतो असे म्हणत राणेंनी प्रकाश महाजनांना पुन्हा डिवचलं. 

प्रकाश महाजनला मी कधी भेटलोही नाही, त्याला उलट्याचा अर्थ कळत नाही. एकट भेट मग सांगतो, अशा शब्दात नितेश राणेंनी पुन्हा एकदा प्रकाश महाजनांना डिवचलं आहे. तसेच, आम्ही त्यांना कशाला मारू, कशाला कोणी 302 अंगावर घेईल तो काही गिनतीत आहे का? असेही राणेंनी म्हटलं. तुम्हाला कोण विचारत नाही, कोण काही देत नाही म्हणून हे सगळं सुरूय. कुणी आत्महत्या करायची धमकी देत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, बाजारात बॉटल किती रुपयांना मिळते माहिती नाही, असेही राणेंनी म्हटले. दरम्यान, निलेश आणि नितेश यांना निष्ठा शिकवण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासारख्या दीड दमडीच्या माणसांकडून तर नाहीच. प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. पुन्हा काही बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिला होता.

वैभव नाईक यांची राणेंवर टीका

तुमच्या चिरंजीवाला काँग्रेसने खासदार केलं तरी तुमचे चिरंजीव सोनिया गांधींबद्दल काय बोलले? तुम्हाला आणि तुमच्या चिरंजीवाला शिवसेनेने मोठं केलं. त्यानंतर तुमचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या बद्दल काय बोलले? तुमचे चिरंजीव ज्येष्ठ नेत्याला काही बोललं तरी ते तुम्ही जनमत म्हणता आणि प्रकाश महाजन जेव्हा काही बोलतात तेव्हा तुम्ही त्यांना धमकी देता? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नारायण राणेंना सवाल केले आहेत. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या भाजप पक्षाला महाराष्ट्रात मोठं प्रमोद महाजन यांनी केलं आणि ज्यांना तुम्ही धमकी दिली ते प्रकाश महाजन प्रमोद महाजन यांचे बंधू आहेत, अशी आठवणही नाईक यांनी राणेंना करुन दिली.

हेही वाचा

राणे म्हणाले उलटी करायला लावू, शड्डू ठोकून प्रकाश महाजन म्हणाले, नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला!