एक्स्प्लोर

नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले

एसीबीसीच्या कारवाईवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी भूमिका मांडली असून माझा “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” असे ते म्हणाले.

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होक आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील 35 हजार रुपये स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर, काँग्रेस नेत्यांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. नरहरी झिरवाळ आदिवासी असल्यानेच त्यांच्या कार्यालयात कारवाई झाली, नाहीतर सगळीकडेच भ्रष्टाचार सुरू असल्याचे नाना पटोले (Nana patole) यांनी म्हटले. 

एसीबीसीच्या कारवाईवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी भूमिका मांडली असून माझा “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” असे ते म्हणाले. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर  निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर, नाना पटोल यांनीही भूमिका मांडताना, राज्यातील सर्वच कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचे म्हटले.  

सरकारमधील प्रत्येक विभागात असा भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र, नरहरी झिरवळ हे आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला गेला. आम्ही किती स्वच्छ असे दाखवण्याचा हे प्रयत्न करत आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्रालयात लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, शासनाच्या प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे उघड सत्य आहे, असेही पटोलेंनी म्हटले. 

16 तारखेपर्यंत एसीबी कोठडी

दरम्यान, मंत्रालयातून अटक करण्यात आलेले अन्न व औषध प्रशासनाचे लिपिक राजू ढेरिंगे यांची 16 तारखेपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ढेरिंगे यांच्यासोबत या लाचप्रकरणात कोणा वरिष्ठांचा सहभाग आहे का? याचा तपास करायचा असल्याची माहिती एसीबीने कोर्टात दिली. त्यामुळे, 16 फेब्रुवारीपर्यंत एसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.  दरम्यान,  लाचलुचपत विभागाने मंत्रालयातील कार्यालय सिल केले होते. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितल्याची माहिती समोर येते आहे. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

चंद्रपुरातील भूमिकेवर बोलणे नानांनी टाळले

चंद्रपूर काँग्रेस वाद आणि नगरसेवकांनी पैसे घेतल्याचा आरोपावर नाना पटोले यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले. मला यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. याबद्दल सर्व माहिती आमच्या हायकमांडकडे गेली आहे, मी काही चर्चा करणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, आता चंद्रपुर नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे चित्र भाजपाचे पहायला मिळेल. देशात अशी परिस्थिती पाहायला मिळेल, असेही पटोले यांनी सांगितले. 

अमेरिका ट्रेड करारामुळे शेतकऱ्यांचे मरण

सोयाबीनचे दर पडले आहेत, मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या करारामुळे शेतकऱ्याचं मरण होणार आहे. भाजपच्या सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या गाजराची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. भाजपाने बाहेरच्या लोकांना घेऊन आपली सत्ता चमकवण्याचा प्रयत्न केला हे सर्व चित्र दिसेल, ही सुरुवात आहे. याचा शेवट फार वाईट असेल, असेही नानांनी म्हटले. 

हेही वाचा

शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget