Congress Leader Surupsing Naik Passed Away: नंदुरबारच्या (Nandurbar) राजकीय वर्तुळातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे निधन (Surupsing Naik Passed Away) झाले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या या निधनाच्या बातमीने काँग्रेससह नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक हे 1981 ते 2019 राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. इंदिरा गांधी आणि गांधी परिवाराचे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असून विश्वासू सहकारी म्हणून नाईक यांची ओळख होती. त्यांच्या या अकाली निधनाच्या बातमीने काँग्रेसच्या गोटात शोककळा पसरली आहे.
Congress Leader Surupsing Naik : सुरुपसिंग नाईक यांची कारकीर्द
नाव : सुरुपसिंग नाईक
गाव: नवागाव तालुका, नवापूर
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते स्वर्गीय इंदिरा गांधींपासून काँग्रेस सोबत एकनिष्ठ गांधी परिवाराचे नाईक यांच्यासोबत कौटुंबिक संबंध
आणीबाणी नंतर इंदिरा गांधींची खांडबारा येथे येथे ऐतिहासिक सभा घेऊन आदिवासी भागात काँग्रेसचे विचार मजबूत ठेवणारा निष्ठावंत कार्यकर्ता
नवापूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे मोठेजाळे उभे करून आदिवासी युवकांना शिक्षणाचा प्रवाहात आणले
नवापूर सारख्या आदिवासीबहुल भागात एमआयडीसीची स्थापना करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले
19 72 ते 1981 नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार
1981 ला खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याचा या राजकारणात प्रवेश
19 81 ्याचे आदिवासी विकास समाज कल्याण मंत्री पद
1981 ते 82 राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य
19 82 नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विधानसभेवर निवड
1982 ते 2009 सलग महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
1982 पासून 2009 पर्यंत आदिवासी विकास विभाग वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन परिवहन विभागाचे मंत्रीपद भूषविले आहे
2009च्या विधानसभा निवडणुकीत पराभव
2014 विधानसभा निवडणुकीत पुन्हा नवापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी
2019 निवडणुकीत राजकारणातून बाजूला होत मुलगा शिरीष कुमार नाईक यांना नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार केले.
इतर महत्वाच्या बातम्या