एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nana Patole : काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अशोक चव्हाण सोडून गेल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? नाना पटोलेंनी सविस्तर सांगितलं

Nana Patole : "मी एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबाबतचा निर्णय हायकमांड घेते. मला पक्ष संघटनेची जबाबदारी मिळाली आहे"

Nana Patole : "मी एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबाबतचा निर्णय हायकमांड घेते. मला पक्ष संघटनेची जबाबदारी मिळाली आहे. ती पूर्ण करुन काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात विजय मिळवून देणे हे माझे काम आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी नेता म्हणून काम करत नाही. त्यामुळे हायकमांड जे निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. पक्षाला मोठं करणं ही माझी जबाबदारी आहे", असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला भाजपने फोडलं

नाना पटोले म्हणाले, देशाच्या राजकारणात काँग्रेसचे आगळेवेगळे महत्व होते आणि राहणार आहे. हे कोणाला लपवता येणार नाही. भाजपला राज्यपातळीवर नेत्यांना संपवायचं आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला त्यांनी फोडलं. पवार साहेबांनी तयार केलेल्या राष्ट्रवादीलाही त्यांनी फोडलं. त्यावेळी आम्ही भूमिका घेतली यांना सोबतच घ्यायचे. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त जागा मिळवून घेतल्या, असा दावाही पटोले यांनी केला. 

खरा विजय राहुल गांधींच्या परिश्रमामुळे आणि इच्छाशक्तीमुळे 

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, लोकसभेत मिळालेल्या यशाचा आनंद आहे. माझ्यापेक्षा महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना जास्त आनंद आहे. खरा विजय राहुल गांधींच्या परिश्रमामुळे आणि इच्छाशक्तीमुळे आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा केल्या. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. राहुल गांधींनी भितीचं वातावरण दूर केलं. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्याच्याच परिणाम आहे की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वांत जास्त जागा मिळाल्या. मी जीवनात ज्या गोष्टी प्राप्त केल्या त्या संघर्षाने केल्या आहेत. माझी खुर्चीची लढाई नाही, जनतेची लढाई आहे. जनतेच्या न्यायाची लढाई आहे. माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेणे आणि त्या ताकदीचा महाराष्ट्र तयार करायचा आहे, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केली. अशोक चव्हाण सोडून गेले , तेव्हा माझ्यासमोर संघर्ष होता. राहुल गांधींनी मला प्रेरणा दिली. त्यांनी सांगितलं की, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ज्याला सोडून जायचंय त्याला सोडून जाऊद्यात. राहुल गांधींचे ते वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. मी त्याच ताकदीने नांदेडमध्ये लक्ष घातलं. यावेळेस तिथे आम्ही जिंकलो. ते एकच नाहीतर आम्ही 3 जागा मराठवाड्यात जिंकल्या, असंही नाना पटोले यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

''...तर पालकमंत्री संदीपान भुमरेंना जिवेच मारू, तुमचा शरद मोहोळ अन् गजू तौर करू''; संभाजीनगरमध्ये 'गब्बर'च्या पत्राने खळबळ, पोलिस अधिकारी फैलावर

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
Embed widget