एक्स्प्लोर

बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole on Bacchu Kadu : बच्चू कडू यांचे गेल्या सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

Nana Patole on Bacchu Kadu : प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सात दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला असून, सरकारने तात्काळ पावले उचलली नाहीत तर राज्यभर शेतकरी आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरुन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून त्यांचे मागण्यांचे समर्थन केले जात आहे. आता काँग्रेसकडून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

आंदोलनाची दखल घेऊन मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात

नाना पटोले यांनी म्हटले की, बच्चू कडू हे ज्या महायुती सरकारचा एक भाग होते, त्याच सरकारकडून आता त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातंय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देते. सरकारनं बच्चू कडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या तातडीनं पूर्ण कराव्या. कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांचे बोनस असेल, नुकसान भरपाई असेल या सर्व मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन काँग्रेस राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात, तालुका आणि गावस्तरापासून शेतकरी आंदोलन उभं करेल. शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध केला जाईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.  

बच्चू कडूंच्या मागण्या पुढीलप्रमाणे

1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.

2. दिव्यांग व विधवा महिलांना रु. 6000/- मानधन देण्यात यावे.

3. आपत्कालीन संकटमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे तसेच शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावे.

4. दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिबृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे.

5. वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे.

6. शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.

7. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

8. रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपीकांत 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावे. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रु. 1000/- मजुरी दिली जावी.

9. संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी.

10. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी.

11. 100% दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावे.

12. शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग (OBC) चे आरक्षण 27% ठेवावे.

13. शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे.

14. शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावे.

15. शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचे बील माफ करून सतत वीजपुरवठा करण्यात यावा.

16. शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी.

17. धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.

आणखी वाचा

दिव्यांगांना 6000 रु मानधन, कर्जमाफीसाठी काय ठरलं?; बच्चू कडूंनी सांगितली सरकारसोबतची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget