Nana Patole Bhandara: रोजगार सेवकांच्या (Rojgar Sevaks) मागण्यांना घेऊन काँग्रेसने नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात शेकडो रोजगार सेवकांचा भंडारा (Bhandara) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निघाला. मात्र, या मोर्चानं भंडारा पोलीस ठाण्यातजवळ आक्रमक वळण घेतलं आणि थेट मोर्चेकरी नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात भंडारा पोलीस ठाण्यात (Bhandara police station) धडकले. दरम्यान संपूर्ण मोर्चेकरी ठाण्यामध्ये धडकल्याने पोलीस प्रशासनाची ही चांगली तारांबळ उडाली. मात्र, मोर्चाच्या पूर्व कल्पनेनं पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांचाही बंदोबस्त वाढविण्यात आला.

Continues below advertisement

Nana Patole: जोपर्यंत सरकारच्या विरोधात 420 चा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत ठाण्यातून उठणार नाही,

दरम्यान, जोपर्यंत सरकारच्या विरोधात 420 चा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत ठाण्यातून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका नाना पटोले आणि रोजगार सेवकांनी घेतली आहे. पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते आणि हे आंदोलन कधीपर्यंत पोहोचण्यात राहतात याकडे नजरा लागलेल्या आहेत.

Continues below advertisement

राज्य सरकारच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या रोजगार सेवकांवर अन्यायकारक अध्यादेश राज्य सरकारनं नुकताच लागू केला. या अध्यादेशाच्या विरोधात भंडाऱ्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात पूर्व विदर्भातील शेकडो रोजगार सेवकांचा हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.

नेमक्याकायआहेत मागण्या? (Rojgar Sevaks Demand)

- 3 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी.

- 24 महिन्यांचे थकीत मानधन द्यावे.

- मानधन आणि प्रवासभत्ता नियमित द्यावा

- रोजगार सेवकांना करणाऱ्या सरकार विरोधात 420 चा गुन्हा दाखल करावा

-सरकार विरोधात गुन्हा दाखल करणार नसल्यास आम्ही ठाण्यातून उठणार नाही.

यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

Nana Patole: मतचोरी आणि लोकशाहीच्या हत्येविरोधात काँग्रेस पक्ष पूर्णपणे आंदोलकांसोबत

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशातील राजकीय परिस्थितीवरून मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. देशात ज्या पद्धतीने मतचोरीचे काम सुरू झाले आहे, लोकशाही संपवण्याचे आणि लोकशाहीची हत्या करण्याचे प्रकार घडत आहेत, त्याविरोधात देशातील जे कोणतेही पक्ष किंवा व्यक्ती आंदोलन करतील, त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अशा मतचोरी करणाऱ्या मोदी सरकारला आणि निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना बाजूला सारण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काँग्रेस पक्ष त्या सर्वांच्या सोबत आहे. मतचोरीच्या या प्रकाराविरोधात सर्व स्तरांवरून तीव्र विरोध दर्शवला जात असून लोकशाहीच्या संरक्षणासाठी काँग्रेस आक्रमक असल्याचे त्यांनी या प्रतिक्रियेतून दाखवून दिले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सिजेपी आज मुंबईत जे आंदोलन करणार आहे, त्यावर नाना पटोले बोलत होते.

इतर महत्वाच्या बातम्या