Nana Patole भंडारा : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मनमानीविरोधातील आंदोलनाला काँग्रेसचा (Congress) पाठिंबा असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काँग्रेस ही आंदोलनात सहभागी होत आहे. SIR च्या माध्यमातून, मत चोरीच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या गडबडी केलेल्या आहेत, त्याची वस्तुस्थिती आता जनतेसमोर आलेली आहे. ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भारतीय जनता पार्टीची (BJP) जी अभद्र युती होती, ती लोकशाहीची रोज हत्या करीत होती. त्याच्या विरोधात जे जे लोक मैदानात उतरतात, त्या सगळ्यांच्या सोबत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष काँग्रेस पक्ष आहे. अशीप्रतिक्रिया काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
या देशाची लोकशाही वाचविणे, हे आमचं दायित्व आहे. शिवायते देशातील प्रत्येक लोकांचं दायित्व आहे. त्याच्यामुळे हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. त्यामुळे या आंदोलनात काँग्रेस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी राहणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दिली. ते भंडारा येथेबोलतहोते.
मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात आज ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार आहेत. आज मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. गर्जना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असं या मोर्चाला नाव देण्यात आलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यापार्श्वभूमीवरकाँग्रेसनेदेखीलअप्रत्यक्षपणेयामोर्च्यालासमर्थनकेलंअसूनयासंदर्भातनानापटोलेंनीसूतोवाचकरतप्रतिक्रियादिलीआहे.
Nana Patole: भाजप सरकार शेतकरी, युवा वर्गांच्या विरोधात, म्हणून मंत्र्यांचे ताफे अडविले जातात
दुष्काळग्रस्त आणि किडींनी फस्त केलेल्या शेत पिकांची पाहणी करण्याकरिता भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतान तुमसर इथं शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप सरकार शेतकरी विरोधी असून युवावर्गांच्या विरोधातही आहे. मागील दोन वर्षांपासून भाजप सरकारनं शेतकऱ्यांना हक्काचा बोनसही दिलेला नाही आणि हमीभाव मिळत नसताना दुसरीकडं महागाई वाढत चाललेली आहे. त्यामुळेचं शेतकऱ्यांचा आता रोष बघायला मिळत असून भाजपचे मंत्री रस्त्यावरही सुरक्षित नाहीत.
Nana Patole: मंत्र्यांनाचं नव्हे तर, आमदारांनाही बंदूकधारी सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात दौरे करावे लागतात
ठीकठिकाणी भाजपच्या मंत्र्यांचे ताफे अडविले जात आहे. भाजपच्या मंत्र्यांनाचं नव्हे तर, आमदारांनाही बंदूकधारी सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात दौरे करावे लागत असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. तर, पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज 9 ते 10 ठिकाणी शेतबांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, शेतकऱ्यांशी हितगुज साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्याची माहिती दिली. कुणी एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटू शकली नसली तरी बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची स्पष्टोक्ती पालकमंत्री भोयर यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
