Nana Patole : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'लाडकी बहीण योजना' आणि 'शेतकरी कर्जमाफी'वरून नवा राजकीय संग्राम सुरु झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लाखांदूरमधील एका कार्यक्रमात राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला. लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसवलं, असा थेट गंभीर आरोप नाना पटोलेंनी सरकार केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या या आरोपांवर आता सत्ताधारी पक्षाचे लोक नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.  

Continues below advertisement

10 बड्या उद्योगपतींचं तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांचं कर्जमाफ केलं

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथील श्रावण मास समाप्ती या धार्मिक कार्यक्रमात नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं आहे. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पटोलेंनी मारलेला हा टोला आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय. सरकार 'लाडकी बहीण' योजनेचे 17 हजार कोटी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे 13 हजार कोटी दिल्याची जाहिरात टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये करते. पण 10 बड्या उद्योगपतींचं तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांचं कर्जमाफ केलं, त्याची जाहिरात सरकारनं कधी टीव्हीवर दाखवली का? असा थेट सवाल पटोलेंनी जनतेला विचारला.

महिलांच्या इतर महत्त्वाच्या योजना हळूहळू बंद केल्या जात आहेत

उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी माफ करण्याऐवजी ही रक्कम जर राज्यातील शेतकऱ्यांसाठी वापरली असती, तर पुढील 10 ते 12 वर्षे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहिला असता, असेही पटोले म्हणाले. सरकार एका बाजूला 1500 रुपये देण्याचे नाटक करतंय आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या इतर महत्त्वाच्या योजना हळूहळू बंद करतंय. हे सरकार म्हणजे बहिणींचे सख्खे भाऊ नाहीत, तर बेईमान भाऊ आहेत, असा टोलाही त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लगावला. आता पटोलेंच्या या "बेईमान भाऊ" आणि 3.5 लाख कोटींच्या कर्जमाफी"च्या आरोपांवर सत्ताधारी काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वकाक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना खात्यावर दर महिन्याला दीड महिन्यांची आर्थिक मदत करते. यावरुनच नाना पटोलेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार एका बाजूला 1500 रुपये देण्याचे नाटक करतंय आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या इतर महत्त्वाच्या योजना हळूहळू बंद करतंय. हे सरकार म्हणजे बहिणींचे सख्खे भाऊ नाहीत, तर बेईमान भाऊ आहेत, असी टीका नाना पटोले यांनी सरकारवर केली.