Nagpur Municipal Corporation Elections 2026 : देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानीचा मानमोर्तब मिरवणारं शहर म्हणजेच संत्रानागरी नागपूर होय. संघभूमी आणि धम्मभूमी असा मोठा इतिहास लाभलेल्या या शहराचं राजकीय स्थान देखील देशाच्याही केंद्रस्थानी राहिलं आहे. नागपूर शहर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा (Nitin Gadkari)  जिल्हा होय. नागपूर महापालिकेत गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे. तर नागपुरात 2022 पासून प्रशासक राज आहे. अशातच नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) निवडणुकीत भाजपनं दमदार कामगिरी केलीय. यात 27 पैकी 21 जागी भाजपने विजय मिळवला आहे. अशातच आत राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर महापालिका निवडणुकीत भाजपचा करिष्मा कायम राहतो कि काँग्रेस आपला गड पुन्हा काबीज करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement

Nagpur Municipal Corporation Elections : नागपूर महापालिकेतील पक्षीय बलाबल

नागपूर महापालिकेत 151 जागा असून आरक्षणाचं प्रमाण 54.30 टक्के आहे. नागपूर महानगरपालिकेत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रतीक्षा होती. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 108, काँग्रेसने 29, बसप 10, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 1 आणि शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या होत्या.

Continues below advertisement

 भाजप 108

* काँग्रेस 29

* बसपा 10

* राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) 1

* शिवसेना 2

* अपक्ष 1

Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेतील राजकीय चित्र

नागपूर (Nagpur) हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे उपराजधानीचे शहर असून राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर आहे.  31 मे 1864 रोजी नागपूरमध्ये नगरपालिका (Nagpur Municipal Corporation) अस्तित्वात आली. त्यावेळी सुमारे सहा हजार चौरस मैल (16 हजार चौ. किमी) क्षेत्रफळ असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या  82000 होती. या नगरपरिषदेचे 2 मार्च 1951 रोजी महानगरपालिकेत रुपांतर झाले.  त्यावेळी या शहराचे महानगरपालिकेअंतर्गत असलेले क्षेत्रफळ 217. 56 चौ.कि.मी होते आणि शहराची  लोकसंख्या 482304  इतकी होती.  

Nagpur Municipal Corporation First Mayor : पहिले महापौर

नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यावेळी  जी. जी. देसाई हे 1 मार्च 1951  ते 3 जुलै 1951 या कालावधीत प्रशासक होते.  त्यानंतर  4 जुलै 1951 ते 10 ऑगस्ट 1952 या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला.  शेषराव वानखेडे यांना. वानखेडे यांनी  24 जुलै 1952 रोजी प्रथम महापौर म्हणून कार्यभार स्वीकारला. ते 14 जानेवारी 1953 पर्यंत महापौर पदी कार्यरत होते. त्यानंतर  वानखेडे यांनी 9 जानेवारी 1954  ते 12 मे 1955 आणि 12 मे 1955 ते 24 जानेवारी 1956  याप्रमाणे सलग दोनवेळा महापौरपद भुषविले. 

1951 साली  नागपूर महापालिका अस्तित्वात आली, त्यावेळी 42 नगरसेवक होते, 70 वर्षानंतर महापालिकेचे क्षेत्र वाढले आणि नगरसेवकांची संख्या 156 पर्यंत पोहोचली.  2017 च्या महानगपालिका निवडणुकीवेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग होता.  परंतु, महाविकास आघाडी सरकारने 2022 मध्ये फेररचाना करताना तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला. त्यानुसार आता 52 प्रभाग आहेत. 

महापालिका स्थापन झाली त्यावेळी महापौर आणि उपमहापौरांचा कालावधी एका वर्षाचा होता. महापौरांना त्यांच्याकडे येणाऱ्या अतिथींच्या स्वागतासाठी दरवर्षी तीन हजार रुपये इतका निधी मिळत असे. नव्या कायद्यानुसार अतिथी भत्ता बंद झाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे येत असल्याने अर्थसंकल्पात महापौरांच्या पाहुण्यांसाठी तीन लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. 75 रुपये ते 20 हजार

महापालिकेची निर्मिती झाली तेव्हा एका नगरसेवकास दरमहा 75 रुपये भत्ता मिळायचा. सभेचा भत्ता होता 10 रुपये. आता महापालिकेच्या नगरसेवकास महिन्याला 20  हजार रुपये मानधन मिळते.

पहिल्या महिला महापौर

शेषराव वानखेडे यांना शहराचे प्रथम महापौर तर त्यांची कन्या कुंदाताई विजयकर यांना पहिल्या महिला महापौर पदाचा मान मिळाला.  कुंदाताई यांनी 5 फेब्रुवारी 1996 ते 9  फेब्रुवारी 1999 पर्यंत महापौर होण्याचा कार्यभार सांभाळला.   

गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 106 नगरसेवक विजयी झाले आणि सगल तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश आहे.  महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 106 काँग्रेस – 29 बहुजन समाज पक्ष – 10 शिवसेना – 02 राष्ट्रवादी – 01 

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडवीस यांचे वर्चस्व

नागपूर महानगरपालिकेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचे वर्चस्व कायम राहिले आहे. या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या निवडणुका होतात. काँग्रस हा विरोधी पक्ष म्हणून काम पाहतो. 

महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

नागपुरात महापालिकेच्या 151 जागा असताना भाजपने सध्या तरी सुमारे 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज आणि कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती आहे. नागपूर भाजपकडून अजूनही अनेक जागांवर एकापेक्षा जास्त सक्षम दावेदार असल्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. भाजपच्या उमेदवारांची यादी उद्याच जाहीर होणार असल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली. नागपूर महापालिकेमध्ये 151 जागा असून युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी सुमारे 8 ते 10 जागा सोडल्यानंतर भाजप किमान 140 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, नागपूरमध्ये मनसे स्वबळावर लढत आहे. ज्या प्रभागात मनसेची ताकद आहे त्याच मोजक्या प्रभागात मनसेने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. आज नागपूर मध्ये मनसेच्या सहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला, यात शहर अध्यक्ष चंदू लाडे सह प्रभाग 16 मधून सरिता गिरे व प्रभाग 35 मधून चेतन शिराळकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. नागपूर शहरात भाजपचा पर्याय म्हणून नागरिक मनसे कडे आशेने पाहत असल्याचा दावा या उमेदवारांनी केला.

हेही वाचा

BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे, भाजपा, राष्ट्रवादीपर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!