Nagpur Graduate Constituency Election 2026 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत (MLC Election 2026) सेवानिवृत्त जीएसटी कमिशनर संजय थुल ही उतरले आहेत. संजय थुल (Sanjay Thool) यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पदवीधर मतदारसंघात आजवर अनेक जण आमदार राहिले, मात्र तरुणांसाठी आवश्यक काम कोणीच केले नाही. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाचा आमदार फक्त उच्च विद्या विभूषितच नव्हे, तर तरुणांचे काम करणाराही असायला हवा, असे संजय थुल म्हणालेय. (Nagpur Graduate Constituency Election 2026)
तरदुसरीकडे बहुजन समाज पक्षाचेसंभाव्यउमेदवारम्हणून संजय थुल आणिबसपाच्याकार्यकर्त्यांनीनामांकनअर्जदाखलकरण्यासंदर्भातरॅलीचंनियोजनकेलंहोतं. मात्रऐनवेळी बहुजन समाज पक्षानं संजय थुल यांना एबी फॉर्म नदेतातांत्रिककारणअसल्याचेसांगितलं. मात्रअखेरच्याक्षणी सेवानिवृत्त IRS संजय थुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातूननिवडणूकलढण्याचानिर्धारकायमठेवलाआहे.
Sanjay Thool: भाजप आणि काँग्रेस दोघांनीही आजवर तरुणांचा भ्रमनिरास केल्याचे आरोप
दरम्यान, भाजप आणि काँग्रेस दोघांनीही आजवर तरुणांचा भ्रमनिरास केल्याचे आरोप ही त्यांनी केलाय. विशेष म्हणजे संजय थूल यांनी बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. बहुजन समाज पक्षाने ही त्यांना तयारी करण्यास सांगितले होते. मात्र अखेरच्या क्षणी बहुजन समाज पक्षाने त्यांना एबी फॉर्म न दिल्यामुळे संजय थुल यांनी अपक्ष म्हणूनच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Nagpur Graduates Constituency Poll: भाजपकडून सुधाकर कोहळे तरकाँग्रेसकडून अभिजित वंजारींमध्येचुरशीचीलढत
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपनं (BJP) सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांना संधी देत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातील विजयासाठी भाजपनं मोठी मोर्चे बांधणी केली असून पक्षातील अनेक नावं ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि पेशाने शिक्षक असलेल्या सुधाकर कोहळेंवर भाजप पक्षानं विश्वास दर्शवत उमेदवारी दिली आहे.
MLC Election Schedule: विधानपरिषद निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026
मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026
इतर महत्वाच्या बातम्या
