Nagpur News: नागपुरातीलभाजपच्या (BJP)गोटातूनएकमिठीबातमीसमोरआलीआहे. यात भाजपनं निवडून (Nagpur Municipal Corporation Election Results 2026) आलेल्या सर्व 102 नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतल्याचे समोर आले आहे. सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य केले किंवा कृती केली, वित्तीय अनियमितता किंवा घोटाळ्यामध्ये सहभाग आढळून आला, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले किंवा इतर गंभीर अनुचित प्रकारात सहभाग आढळून आले, तर पक्ष माझ्या विरोधात कारवाई करू शकेल आणि माझा राजीनामा घेऊ शकेल, असे हमी पत्राच्या स्वरूपातील राजीनामे लिहून घेण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, एबीपी माझा ने यासंदर्भात भाजप (BJP) शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या कुठल्याही नगरसेवकाने चूक केली, तर पक्ष माझ्या विरोधात कारवाई करू शकेल, राजीनामा घेऊ शकेल, असे हमीपत्र लिहून घेतल्याच्या माहितीला दुसरा दिला आहे.

दरम्यान, भाजपकडून हे पहिल्यांदा झालेले नसून यापूर्वी 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांकडूनही अशाच पद्धतीने राजीनामा स्वरूपातील हमीपत्र लिहून घेतले होते, अशी माहितीही भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.

Nagpur BJP:  हमीपत्रातनेमकंकाय?

-सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य केले किंवा कृती केली,

-वित्तीय अनियमितता किंवा घोटाळ्यामध्ये सहभाग आढळून आलं,

-जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले,

-इतर गंभीर अनुचित प्रकारात सहभाग आढळून आले तर पक्ष माझ्या विरोधात कारवाई करू शकेल आणि माझा राजीनामा घेऊ शकेल.

Nagpur Mayor : नागपूर महापौराचा शपथविधीचा मुहूर्त ठरला!

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं असून भाजपने आपला बाल्लेकिल्ला राखला आहे. त्यामुळे महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर महापौर (Nagpur Mayor) पदाची माळ नेमकी कुणाच्या गळयात आणि नेमकं कधी पडणार या संदर्भात आतुरता लागलीय. अशातच आता नागपूरच्या महापौर पदाच्या शपथविधीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. महापौर पदाच्या (Nagpur Mayor) शपथविधीचा मुहूर्त ठरला असून भाजपच्या महिला महापौर येत्या 6 फेब्रुवारीला शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या सर्व 151 जागा चे कल हाती (Nagpur Municipal Corporation Election Results 2026)

भाजप (BJP) -102काँग्रेस (Congress) - 37शिवसेना शिंदे - 2राष्ट्रवादी (अजित पवार) -1शिवसेना (ठाकरे) - 1BSP - 4AIMM_- 4

इतर महत्वाच्या बातम्या