एक्स्प्लोर

'नगरसेवक' शब्द देशभरात वापरावा; शिवसेनेची दिल्लीत मागणी; सांगितला बाळासाहेबांचा इतिहास

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून बाळासाहेबांचा वारसा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत.

नवी दिल्ली: महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) जाहीर होणार आहेत. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही दिल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंची शिवसेनाही (Shivsena) रणनीती आखत असून आता दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ‘नगरसेवक’ हा शब्द देशभरात नेण्याची शिंदेसेनेची रणनीती असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, नगरसवेक या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांनी केला होता. सन 1967 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी महापालिकेत निवडून जाणाऱ्या सदस्यांना नगरसेवक म्हणण्याचा आदेश दिला, तेव्हापासून नगरपालिका सदस्यांना नगरसेवक म्हटले जात आहे. आता, देशभरात हाच पॅटर्न राबविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून येत आहेत. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून बाळासाहेबांचा वारसा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत. देशभरातील सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना नगरसेवक म्हटलं पाहिजे, अशी मागणीच शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनी केली आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी ही मागणी केली. हरियाणातील मानेसर येथे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिली राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. देशभरातील महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त या परिषदेला हजर होते. केंद्रीय शहर व गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर , लोकसभा अध्यक्ष ओम बिरला हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या परिषदेत बोलताना रविंद्र वायकर यांनी नगरसेवक शब्दामागची भूमिका सांगत देशभरातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नगरसेवक म्हटले जावे, अशी मागणी केली आहे. 

नगरसेवक शब्दाचा इतिहास काय?

महाराष्ट्रात, मुंबई, ठाण्यात ब्रिटिशकाळापासून महापालिका, नगरपालिका सदस्याला सिटीफादर म्हणजेच नगरपिता म्हटले जात. मात्र, शिवसेना 1967 साली ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उतरली. प्रचारादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं की, निवडून येणारा काय तुमचा बाप आहे का, त्याला पिता म्हणता? तुम्ही त्याचे बाप आहात. आमचे सदस्य पिता नाही तुमचे सेवक असतील, नगरसेवक असतील. पुढे हाच शब्द अधिकृत करण्यात आला, असं शिवसैनिक सांगतात. त्यामुळे, नगरसेवक हा शब्द बाळासाहेबांनीच दिल्याचं बोललं जातं. आता, तो शब्द देशभरात घेऊन जाण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे. 

हेही वाचा

 नितेश राणे म्हणाले, मनसेवाल्यांनी भेंडीबाजारात जाऊन टोपीवाल्यांना मारुन दाखवावं, आता संदीप देशपांडेंचं जशास तसं उत्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yogesh Kadam on LGP Gas Shortage: राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसात....
राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसात....
Ambadas Danve : भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
LPG Gas Shortage: कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Embed widget