Murli Manohar Joshi on Dharmendra Pradhan Resignation : नीट-यूजी (NEET-UG) परीक्षा घोटाळा आणि त्यानंतर उसळलेल्याप्रदीर्घसंघर्षानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी (Dharmendra Pradhan) आपल्यापदाचाराजीनामादिलाआहे. गेल्या 12 वर्षाच्यामोदीसरकारचाकार्यकाळातएकामंत्र्यानेदिलेलाहापहिलाचराजीनामाअसूनभाजपला (BJP) हाएकधक्काअसल्याचेमतराजकीयवर्तुळातउमटतआहे. तरदुसरीकडे हा युवा आंदोलनाचा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यानएकीकडे राज्यासहदेशाचंराजकारणसध्यायाचमुद्दयांवरफिरतअसूनआणिविरोधकांनी टीकेचीझोडउठवलीअसतानाआताभाजपच्याएकाजेष्ठनेत्यानंसरकारलाघराचाआहेरदिलाआहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांनी 'उशिरा का होईना, पण झाले हेच बरे झालेअसल्याचीप्रतिक्रियादिलीआहे. मुरली मनोहर जोशी यांनी ट्विटरवर याविषयवारभाष्यकरतप्रतिक्रियादिलीआहे.

Continues below advertisement

Murli Manohar Joshi : 'शांततेने आंदोलन संपवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. मला आशा आहे की...'

दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन संपले असून, सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांवर चर्चा केली आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, ज्याला दोन्ही नेत्यांनी सरकारच्या वतीने सहमती दर्शवली. अशातच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'उशिरा का होईना, पण झाले हेच बरे' पुढे पंतप्रधानांना सल्ला देताना ते म्हणाले, 'मला आशा आहे की पंतप्रधानही या विषयावर लवकरच वेळेवर निर्णय घेतील; विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी लिहिले कि, "शांततेने आंदोलन संपवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. मला आशा आहे की भारतीय शिक्षण क्षेत्रात लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी भरपूर संधी मिळतील."

Continues below advertisement

विशेषम्हणजे, 2014 मध्ये केंद्रात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांची पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात रवानगी केली होती. लालकृष्ण आडवाणी यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शनाची भूमिका देण्यात आली होती. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी दिलेलीप्रतिक्रियाराजकीयवर्तुळातकाहीशीखळबळउडवूनदेणारी आसल्याचे बोललंजातआहे.

मुरली मनोहर जोशी नेमकंकायम्हणाले?

उशिरा का होईना, पण अखेर राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मला आशा आहे की पंतप्रधानही या विषयावर लवकरच योग्य तो निर्णय घेतील. ज्या विद्यार्थ्यांनी शांततेने आपले आंदोलन संपवले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. मला आशा आहे की भारतीय शिक्षण क्षेत्रात लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व प्रगतीसाठी भरपूर संधी मिळतील.

Manohar Lal Khattar : अनेक समस्यांचा शेवट गोड व्हायला हवा : मनोहरलाल खट्टर

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, 'अनेक समस्यांचा शेवट गोड व्हायला हवा. आपण सर्वांनी तरुणांचे महत्त्व लक्षात ठेवले पाहिजे आणि समाजात कोणताही चुकीचा संदेश जाणार नाही याची खात्री केली पाहिजे. आजची तरुण पिढी ही आपल्या देशाची निर्माते आहे. त्यांनी कोणतीही धारणा तयार केली आहे, मग ती बरोबर असो वा चूक, हा मुद्दा नाही, पण जर धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असेल, तर मी त्यांचे कौतुक करतो." असेहीतेम्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या