एक्स्प्लोर

Murbad Nagar Panchayat : मुरबाड नगरपंचायतीत भाजपला मोठा धक्का! 10 पैकी 9 नगरसेवक फुटले, पक्षाच्याच उमेदवाराला पाडलं, जिल्हाधिकाऱ्यांचीही मान्यता

Murbad Nagar Panchayat : भाजपचे नऊ नगरसेवक एकत्र येत ‘मुरबाड परिवर्तन पॅनल’ स्थापन करण्यात आलाय. त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीतील भाजपचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

Thane News : मुरबाड नगरपंचायतीतील (Murbad Nagar Panchayat) दहा नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून, त्या गटाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीतील भाजपचे (BJP) वर्चस्व संपुष्टात आले असून, स्थानिक आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार किसन कथोरे यांचा प्रभाव असला, तरी नगरपंचायतीत गेल्या निवडणुकीत (Election) भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. एकूण 17 नगरसेवकांपैकी भाजपचे 10, शिवसेनेचे 5, तर अन्य दोन अपक्ष नगरसेवकांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडून आले. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले. आमदार कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. प्रत्यक्ष निवडणुकीत काही नगरसेवकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करत भाजपच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला.

'मुरबाड परिवर्तन पॅनल' स्थापन, जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता

या घडामोडीनंतर भाजपचे नऊ नगरसेवक एकत्र येत ‘मुरबाड परिवर्तन पॅनल’ स्थापन करण्यात आला. 26 मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला होता. अखेर 9 जून रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या पॅनलला स्वतंत्र गटाची मान्यता दिली. यामुळे आता मुरबाड नगरपंचायतीत भाजपकडे फक्त एक नगरसेवक आणि दोन समर्थक नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे पक्षाचे स्थानिक राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे.

नगरसेवक आमच्या संपर्कात; भाजपचा दावा

दरम्यान, भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी वेगळा गट झाल्याची कबुली दिली असली तरी, ते नगरसेवक अद्याप भाजपपासून फारसे दूर गेले नसल्याचा दावा केला आहे. “उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती, मात्र इतर कोणतीही नाराजी नाही. आम्ही त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक होणार होती, पण काही अडचणीमुळे ती होऊ शकली नाही. तरीही नगरसेवक आमच्यासोबतच आहेत,” असे डाकी यांनी स्पष्ट केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar-Ajit Pawar: शरद पवार अन् अजित पवार एकत्र येण्याची दाट शक्यता; बारामतीमध्ये मोठी राजकीय घडामोड

Municipal Elections : राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच? प्रभाग रचना, आरक्षण अन् मतदार यादीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
Embed widget