= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाची वेळ संपली राज्यातील 29 महापालिकांच्या मतदानाची वेळ संपली आहे. मुंबईत दुपारी साडेतीनपर्यंत 41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026 : मुंबईपासून पुण्यापर्यंत कुठे किती टक्के मतदान झाले? निवडणुकीचे थेट अपडेट्स एका क्लिकवर साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
बृहन्मुंबई महानगरपालिका : ४१.०८ टक्के
पुणे : 39 टक्के
ठाणे -41 टक्केवारी
पिंपरी चिंचवड - 40.05 टक्के
कोल्हापूर - 50.85 टक्के
इचलकरंजी : 46.3टक्के
नागपूर : ३७.१९ टक्के
सोलापूर : ४०. ३९ टक्के
अकोला : 43.35 टक्के
धुळे : 36.49 टक्के
परभणी : 49.16%
इचलकरंजी : ४६.२३ टक्के
जालना : 45.94 टक्के
नांदेड : 41.65 टक्के
अहिल्यानगर : 48.49 टक्के
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यात बोगस मतदानाचा अजब प्रकार, मतदान केंद्रावर महिला न येतच तिच्या नावाने कोणीतरी दुसरच करून गेलं मतदान पुण्यात बोगस मतदानाचा अजब प्रकार, मतदान केंद्रावर महिला न येतच तिच्या नावाने कोणीतरी दुसरच करून गेलं मतदान
पुण्यातील मतदान केंद्रावर मोठा घोळ
पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यानंतर संबंधित महिलेने बेधडक सवाल केले. यानंतर तिच्याकडून पोस्टल मतदान करून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर घडली आहे. शेख हसीना असे या महिलेचे नाव असून विशेष म्हणजे गेल्या 35 वर्षांपासून ती महिला याच मतदान केंद्रावर करते मतदान..
= liveblogState.currentOffset ? 'center_block hidden' : 'center_block'">
Continues below advertisement
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Jalgaon Municipal Corporation Election : जळगावमध्ये गोळीबाराचा थरार, पोलिसांची तातडीची कारवाई
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही गोळीबाराची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा भागातील रहिवासी असलेले सचिन आणि मुस्तफा या दोन तरुणांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला. मात्र गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून आणि कोणत्या शस्त्रातून करण्यात आला, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, “पिंप्राळा परिसरातील सचिन आणि मुस्तफा या तरुणांमध्ये आर्थिक विषयावरून वाद झाला होता. त्यातूनच ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेचा मतदान प्रक्रियेशी कोणताही संबंध नाही.”
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahanagarpalika Election 2026: पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले पुन्हा एकदा पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले आहेत.
गेल्या काही वेळापासून मतदार तसेच पद्धतीने रांगेत उभे आहेत मात्र अजूनही दुसऱ्या मशीन उपलब्ध झालेले नाहीत..
मतदार त्यांचा रोष पाहायला मिळतोय..
काही मतदार मतदान न करता मतदान केंद्र वरून परत चालले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Jalgaon Mahanagarpalika Election 2026: जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील मतदार केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील मतदार केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
अन्य पक्षाचे उमेदवार मतदान केंद्रा बाहेर उभे राहून प्रचार करत असल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शीतल पाटील यांचा आरोप करत पोलिसांना या बाबत जाब विचारला आहे
पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असतानाही पोलीस पात्र बघायची भूमिका घेत असल्याचाही हेतल पाटील यांनी केला आरोप
सदर प्रकाराबाबत उमेदवार हेतल पाटील यांनी पोलिसांना जाब विचारल्याने शाब्दिक बाचाबाची
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Amravati Election 2026: अमरावतीत लोकशाहीचा खून होतोय: अभिजित अडसूळ अमरावती महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर डावीकडून उजवीकडे ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या...
शिवसेना शिंदे गटाचे नेते कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचा आरोप...
अ ब क ड अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन लावायला पाहिजे होत्या... मात्र चुकीच्या पद्धतीने ड क ब अ अशा पद्धतीने ईव्हीएम लावण्यात आल्याचा अभिजित अडसूळ यांचा आरोप...
अमरावतीमध्ये लोकशाहीचा खुन होत आहे....
जिल्हाधिकारी पासून सर्व निवडणूक कर्मचारी अधिकारी अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करत आहे..
विरोधकांना हार दिसत आहे त्यामुळे डावीकडून उजवीकडे ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मातोश्रीवर काल रात्री भाजपची अन् उद्धव ठाकरे यांची गुप्त बैठक... मतदानाच्या दिवशी वंचितच्या नेत्याचा गौप्य स्फोट महापालिका निवडणूक मध्ये मतदानाच्या दिवशी वंचितचा गौप्य स्फोट
बैठकीमध्ये मुंबईचा महापौर निवडीपर्यंतची चर्चा झाली असल्याची माहिती
मुंबई येथे मातोश्रीवर भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून दिल्ली वरून मिश्रा नावाचे गृहस्थ रात्री तीन वाजता मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतली आहे. ठाकरे बंधू भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचा आव आणत आहेत, परंतु भाजपच्या विरोधात पर्याय म्हणून आपण लढत आहोत असा देखावा करत आहे. मतदानाच्या पूर्वसभेला मिश्रा नावाचे भाजपचे गृहस्थ उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या जागेवर एकमेकांना मदत करायची आहे, संभाव्य निकाल बघता महापौर निवडी पर्यंत आपण कशा पद्धतीने सोबत येऊ शकतो अर्थात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊन महापौर्णिमेच्या संदर्भात काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे, अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे. संविधान वादी सेक्युलर मतदारांनी ठाकरे बंधूंच्या या खेळीला समजून घ्यावं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कल भाजपच्या दिशेने जात आहे. त्यामुळे काल रात्रीची घटना लक्षात घेऊनच सेक्युलर मतदारांनी मतदान करावं असा आवाहन व्यक्तीच्या वतीने करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026 : पुण्यात गोगलगायीच्या चालीपेक्षा संथगतीने मतदान, कोल्हापूरात सुपरफास्ट, मुंबईसह बाकी महानगरपालिकांमध्ये 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले? बृहन्मुंबई महानगरपालिका : 17.58 टक्के
पुणे - 10.50 टक्के
नवी मुंबई- 15 टक्के
कोल्हापूर : 22.45 टक्के
इचलकरंजी - 18.57 टक्के
पिंपरी चिंचवड - 16.03 टक्के
संभाजीनगर - 16 ते 17 टक्के
नाशिक - 14.31 टक्के
सांगली मिरज कुपवाड महापालिका - 17.20 टक्के
सोलापूर : 18.08 टक्के
अहिल्यानगर : 20.16 टक्के
जळगाव शहर : 13.39 टक्के
धुळे : 14.23 टक्के
नागपूर : 12 टक्के
पनवेल : 17 टक्के
मालेगाव - 20.92 टक्के
जालना - 20.13 टक्के
अमरावती - 17.02 टक्के
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026 : महानगरपालिकांतील मतदानाचा उत्साह, पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूरमध्ये जोरदार उपस्थिती राज्यातील 29 महापालिकांसाठी सुरू असलेल्या मतदानात सकाळीच जोरदार गती दिसून येत आहे.
पुणे: साडेअकरा वाजेपर्यंत पुण्यात मतदानाची टक्केवारी १२.५०% नोंदवली गेली आहे.
नवी मुंबई: सकाळी ११:३० वाजेपर्यंत नवी मुंबईत १५% मतदान झाले असून, मतदारांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे मतदान केंद्राबाहेर लांब रांगा दिसल्या.
कोल्हापूर: सकाळी ११:३० वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये १७.८३% मतदानाची नोंद झाली आहे.
मतदारांचा उत्साह आणि मोठ्या संख्येने उपस्थिती या निवडणुकीला सजीव बनवत आहेत. तसेच, मतदान केंद्रांवर सुरक्षेची आणि व्यवस्थेची पूर्ण तयारी असल्याचे पाहायला मिळाले.
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले असून, लोकशाहीत सहभाग घेण्याचा हा दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Jalgaon Municipal Corporation Election : जळगाव शहराच्या आर. आर. विद्यालयात बोगस मतदानाच्या आरोपातून गोंधळाचे वातावरण जळगाव शहराच्या आर. आर. विद्यालयात बोगस मतदानाच्या आरोपातून गोंधळाचे वातावरण !
प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये बोगस व दुबार मतदार येत असल्याचे आरोप !
प्रभाग पाच अ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्यात आहे थेट लढत !
Ancr : जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपामुळे आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यात थेट लढत सुरू आहे. सकाळपासून संशयास्पद मतदार आल्याचा आरोप करत ॲड. पियुष पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार ४० ते ४५ मतदारांकडून ओळखपत्र व आवश्यक पुरावे मागवण्यात आले; मात्र ते सादर न होऊ शकल्याने संबंधितांना मतदान करू देण्यात आले नाही. या प्रभागात सुमारे तीन हजारांहून अधिक बोगस व दुबार मतदार असल्याची तक्रार आपण यापूर्वीही केल्याचा दावा पाटील यांनी केला. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली असून, या सर्व घडामोडींमुळे आर. आर. विद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Bhiwandi Municipal Corporation Election : भिवंडी प्रभाग १ मध्ये तणाव! महेश चौघुले समर्थकांवर मारहाण; व्हिडिओ व्हायरल भिवंडी शहरातील प्रतिष्ठित प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणुकीसंदर्भात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोंबडपाडा, संगम पाडा आणि नजराणा कंपाऊंड परिसरातील या प्रभागात माजी महापौर दांपत्य विलास-पतिभा पाटील आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांची चुरशीची लढत रंगली आहे.
याठिकाणी प्रथमच भाजप आमदार महेश चौघुले यांनी आपला मुलगा मित चौघुले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आव्हान उभे केले असून, त्यामुळे या प्रभागाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे.
कोंबडपाडा चौकात दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि गर्दी पांगवली.
दरम्यान, या प्रभागात आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी कोणार्क विकास आघाडीचे कार्यकर्ते, ज्यात विलास पाटील यांच्या कार्यकर्ते आहेत, त्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nashik Municipal Corporation Election : नाशिकच्या देवळाली गाव परिसरात एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात नाशिकच्या देवळाली गाव परिसरात एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
रोख रक्कमेसह शासनाचे बनावट ओळखपत्र आणि मतदार पावत्या आढळून आल्याचा नागरिकाचा आरोप
नागरिकांनी संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले
पोलिसांकडून संशयिताची केली जात आहे चौकशी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Municipal Corporation Election : प्रभाग २४ मध्ये ईव्हीएम बिघाड; भाजप उमेदवाराची आयोगाकडे वेळ वाढवण्याची मागणी पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांनी मतदान प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जांगेकर विरुद्ध बिडकर अशी चुरशीची लढत असलेल्या या प्रभागात सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणींमुळे जवळपास सहा मतदान यंत्रणा बंद पडल्याचे त्यांनी सांगितले.
या तांत्रिक बिघाडामुळे संबंधित मतदान केंद्रांवरील मतदारांना सुमारे एक तास थांबावे लागले. मात्र सध्या सर्व मतदान यंत्रणा पुन्हा सुरळीत सुरू झाल्या असून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बिडकर यांनी दिली.
मतदान यंत्रणा बंद राहिल्यामुळे मतदारांचा झालेला वेळेचा अपव्यय लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवून द्यावी, अशी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीवर निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना गणेश बिडकर यांनी पुणे शहरात भाजप 120 जागा जिंकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. पराभव समोर दिसत असल्यामुळेच विरोधक भाजपवर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इतर शहरांमध्ये लढत चुरशीची असली तरी पुण्यात भाजपच आघाडीवर असल्याचा दावा त्यांनी केला.
उद्या दुपारपर्यंत निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असेही गणेश बिडकर यांनी सांगितले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Jalgaon Mahapalika Election : निवडणुकीत तणाव! शिवसेनेच्या विष्णू भंगाळेंचे अपक्ष पियुष पाटीलांवर गंभीर आरोप, कार्यकर्त्याला मारहाण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच उमेदवार विष्णू भंगाळे यांनी अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पियुष पाटील हे दहशत निर्माण करत असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप भंगाळे यांनी केला आहे.
या घटनेत शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत असून, संबंधित कार्यकर्ता सध्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांकडून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असून, घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ichalkaranji Municipal Corporation Election : पराभवाची धास्ती; विरोधकांकडून पैसेवाटपाचे खोटे आरोप – राहुल आव्हाडे इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना इचलकरंजीचे आमदार राहुल आव्हाडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आपला पराभव समोर दिसू लागल्याने विरोधक आमच्यावर पैसे वाटप केल्याचे खोटे आरोप करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
आमदार राहुल आव्हाडे म्हणाले की, भाजपा महायुतीचे उमेदवार कुठेही पैसे वाटप करत नाहीत. “लोकशाहीच्या या प्रक्रियेत पैसे वाटणे चुकीचे असून आम्ही स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुकीवर विश्वास ठेवतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी इचलकरंजीतील जनतेचा विश्वास आमच्यावर असल्याचा दावा करत, “इचलकरंजी महापालिकेत भाजपा महायुतीची सत्ता निश्चित येणार आहे,” असा विश्वासही व्यक्त केला.
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत, विकासाच्या मुद्द्यांवरच जनता मतदान करेल, असा विश्वास आमदार राहुल आव्हाडे यांनी व्यक्त केला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Jalgaon Municipal Corporation Election : जळगावमध्ये खळबळ : बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणाला चोप; अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचा राडा जळगाव जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बोगस मतदानाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका तरुणाला अपक्ष उमेदवार पियुष पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावमधील एका मतदान केंद्रावर हा तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. तो बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा संशय अपक्ष उमेदवार पियुष पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आला. यावरून बाचाबाची होऊन संतप्त कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला मतदान केंद्राच्या परिसरातच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत जमावाच्या तावडीतून त्या तरुणाला सोडवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा तरुण थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, हा तरुण चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. तो या ठिकाणी मतदानासाठी का आला होता आणि त्याच्याकडे असणारी कागदपत्रे अधिकृत आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nashik Municipal Corporation Election : प्रभाग क्रमांक २४ मध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ - *नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ...*
* *शिवसेना शिंदे यांच्या उमेदवारांकडून धनुष्यबाण दाबल्यानंतर ईव्हीएम मध्ये भाजपचा लाईट लागत असल्याचा दावा...*
- मतदारांकडून देखील संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार...
* *तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकवलं जात असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा आरोप...*
* प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर गोंधळ...
-- डॉ. पुनम महाले , उमेदवार शिवसेना शिंदे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : 'हे लोकशाहीचे धिंडवडे, संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी राबतंय...'; मतदान करताच निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला "निवडणुका जिंकायच्या आणि त्यासाठी वाटेल ते करायचं, असा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. ही निवडणूक नसून फ्रॉड आहे," अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या निवडणूक पद्धतीवर आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडून होत असलेल्या कथित गैरप्रकारांबाबत त्यांनी मनसैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवत सरकारला धारेवर धरले. त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
दुबार मतदारांचा प्रश्न : आधी प्रशासनाने दुबार मतदारांचा विषय फेटाळून लावला, मात्र आता तो मान्य करावा लागत आहे. नुकताच एक दुबार मतदार पकडला गेल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
VVPAT आणि पाडू मशीन : "VVPAT दाखवण्याबाबत पारदर्शकता नाही. 'पाडू' नावाचे मशीन आणले आहे, पण त्यात नक्की काय होते हे मतदारांना दिसत नाही. सरकारने कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचेच ठरवले आहे," असा आरोप त्यांनी केला.
शाईचा घोळ : आजवर मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसता येत नव्हती. पण आता सॅनिटायझर लावले की शाई पुसली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रशासनावर टीका आणि मनसैनिकांना आदेश
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "संपूर्ण प्रशासन सध्या केवळ सत्तेसाठी मागे लागले आहे. अमित साठम यांनी या मुद्द्यावर बोलू नये. हे जे काही सुरू आहे, त्याला लोकशाही म्हणता येणार नाही."
मनसैनिकांसाठी सूचना: १. मतदानावेळी प्रत्येक केंद्रावर अत्यंत सतर्क राहा. २. शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे प्रकार घडत असल्यास त्यावर लक्ष ठेवा. ३. बाहेर पडा, शाई पुसा आणि पुन्हा आत जा, असे प्रकार झाल्यास तात्काळ कारवाई करा.
"आम्ही हे प्रकार खपवून घेणार नाही," असा इशारा देत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मतदानादिवशी 'वॉच' ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Akola Municipal Corporation Election यादीत नावच नाही! मतदान केंद्रावर गोंधळ, अकोल्यात प्रभाग १७ मध्ये मतदारांची प्रचंड गर्दी अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर सकाळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मतदान यादीत अनेक मतदारांची नावे नसल्यामुळे मतदानाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असून काही काळासाठी मतदान केंद्र परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
मतदानाचा वेग मंद असल्याने रांगा अधिक वाढत असून प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन घेत आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मतदान प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी मतदारांकडून केली जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026 : मुंबईपासून पुण्यापर्यंत कुठे किती टक्के मतदान झाले? निवडणुकीचे थेट अपडेट्स एका क्लिकवर राज्यात महापालिका आणि सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून सकाळी ९.३० वाजेपर्यंत विविध महापालिकांमधील मतदानाचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत.
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.९८ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी ७ ते ८ या एका तासात अंदाजे ७ ते ८ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
पुणे महानगरपालिकेत मात्र पहिल्या दोन तासांत केवळ ५.५ टक्के मतदान नोंदवले गेले असून मतदानाचा वेग तुलनेने मंद असल्याचे चित्र आहे.
सोलापूरमध्ये सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ६.८६ टक्के मतदान झाले आहे.
सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत ६.४५ टक्के मतदान नोंदले गेले.
परभणी शहर महानगरपालिकेसाठी सकाळच्या पहिल्या दोन तासांत ९.१० टक्के मतदान झाले आहे.
तर मालेगाव महापालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत ११.०९ टक्के मतदान झाले असून मालेगावमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत आहे.
अमरावती महानगरपालिकेत सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ६.६ टक्के मतदान झाले.
जालना महानगरपालिकेत याच कालावधीत ८.२४ टक्के मतदान नोंदले गेले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत साडेनऊ वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले आहे.
अहिल्यानगरमध्ये सकाळी ९.३० वाजेपर्यंत ८.१४ टक्के मतदान झाले आहे.
पनवेल महानगरपालिकेत सकाळपासून आतापर्यंत सुमारे ८ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
लातूरमध्ये पहिल्या दोन तासांत ७.०९ टक्के मतदान झाले आहे.
धुळे महापालिकेत पहिल्या दोन तासांत ५.५१ टक्के मतदान झाले.
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.४८ टक्के मतदान झाले आहे.
नांदेड महापालिकेत सकाळी ९.३० वाजेपर्यंत ७.१६ टक्के मतदान झाले आहे.
तर जळगाव शहर महानगरपालिकेत सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ५.५ टक्के मतदान नोंदवले गेले आहे.
दरम्यान, दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Latur Municipal Corporation Election : मतदानासाठी चित्रपटगृह बंद, लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना आवाहन लातूर – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यास प्रोत्साहन देण्यासाठी लातूरमधील चित्रपटगृह आज बंद ठेवण्यात आले आहेत.
स्थानीय प्रशासनाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी बाहेरून आढावा घेतला असून, त्यांनी नागरिकांना मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करण्याऐवजी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन केले.
लातूरमध्ये 70 जागांसाठी 18 प्रभागांमध्ये 359 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अंदाजे तीन लाख 21 हजार 354 मतदार हे 375 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
चित्रपटगृह बंद करून प्रशासनाने लोकांना मतदानाच्या महत्वाची जाणीव करून देण्याचा उपक्रम राबवला असून, नागरिकांनी सक्रीय होऊन मतदानात भाग घेणे अपेक्षित आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026 : मुंबईपासून पुण्यापर्यंत मतदान गती मंद, कुठे किती टक्के मतदान झाले? निवडणुकीचे थेट अपडेट्स एका क्लिकवर आजच्या महापालिका आणि सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत काही महत्वाचे मतदानाचे आकडे समोर आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी ९.३० पर्यंत ६.९८% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी ७ ते ८ या एका तासात अंदाजे ७ ते ८% मतदान झाले आहे.
तर पुण्यातील पहिल्या दोन तासांत फक्त ५.५% मतदान नोंदले गेले आहे.
सोलापूरमध्ये सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.८६% झाली आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.४५% इतकी आहे.
परभणी शहर महानगरपालिकेसाठी सकाळच्या दोन तासांमध्ये 9.10% एवढं मतदान...
मालेगाव महापालिका निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 11.09 टक्के मतदान...
अमरावती महानगरपालिका निवडणूक - सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 6.6 टक्के मतदान..
पिंपरी चिंचवड - महापालिकेच्या निवडणुकीत साडेनऊ वाजेपर्यंत 6.56 टक्के मतदान...
अहिल्यानगर 9:30 पर्यंत 8.14 टक्के मतदान
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत सकाळपासून आतापर्यंत 8 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळते
लातुर - पहिल्या दोन तासातील मतदानाची टक्केवारी 7.09 टक्के
सकाळच्या ह्या तासांत मतदानाची गती तुलनेने मंद असल्याचे दिसून येत असून, नागरिकांनी अधिक सक्रिय होऊन मतदान करावे, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Vasai-Virar Municipal Corporation Election : मतदान केंद्रावर मशीन तीन तास बंद वसई – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक मतदान केंद्राची मशीन तब्बल तीन तास बंद राहिल्याची घटना समोर आली आहे.
सकाळपासूनच काही ठिकाणी मशीन अर्धा ते एक तास बंद असल्याचे निदर्शनास आले, मात्र प्रभाग क्रमांक २६, उमेळमान येथील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक ३, मतदान केंद्र २८ येथे मशीन तब्बल तीन तास बंद होती. यामुळे येथील उमेदवार आणि मतदारांमध्ये चांगला तणाव निर्माण झाला.
शिवाय, काही ठिकाणी विशिष्ट पक्षाचा लोगो दाबला जात नसल्याचे तक्रारी देखील मिळाल्या. वास्तविक एक्स्ट्रा मशीन उपलब्ध असूनही, बिघाड झाल्यानंतर १०-१५ मिनिटांत नवीन मशीन लावणे आवश्यक असते, मात्र निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार यामुळे स्पष्ट झाला आहे.
मतदान प्रक्रियेतील ह्या तांत्रिक गफलतीवर सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, आणि मतदार सुरक्षितपणे मतदान करू शकतील यासाठी तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mira Bhayandar Municipal Corporation Election : मतदान केंद्रावर भाजपच्या पोलिंग एजंटवर आक्षेप, निवडणूक अधिकारी म्हणाले, नियमांतर्गत परवानगी आहे मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत मतदान सुरू असताना, भाजपचे पोलिंग एजंट उमेदवाराचे नाव असलेले बिल्ले लावून मतदान केंद्रात बसले असल्याचे निदर्शनास आले. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी स्पष्ट केले की, नाव असलेले बिल्ले लावून पोलिंग एजंट बसू शकतात, असे 2017 च्या जीआरच्या आधारे नियमांतर्गत परवानगी आहे.
विरोधकांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : दुबार मतदान रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून भगवे गार्ड्स तैनात, दादरमध्ये खास लक्ष्य मुंबई – महापालिका निवडणुकीत दुबार मतदान टाळण्यासाठी ठाकरे बंधूंकडून प्रत्येक मतदान केंद्रावर भगवे गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत.
दादरमधील बालमोहन विद्यामंदिर मतदान केंद्राजवळही भगवे गार्ड्स उभे आहेत, आणि तेथे सतर्क नजर ठेवली जात आहे.
सध्या दुबार मतदारासंदर्भात अधिकृत तक्रारी आल्याची माहिती नाही, मात्र मतदार यादीत नाव न आल्यास, दुसऱ्या केंद्रावर मतदान करण्यासंबंधी तसेच ईव्हीएमसंदर्भात काही तक्रारी मतदार स्वतः बोलून दाखवत आहेत.
स्थानिक भगवे गार्ड्ससोबत संवाद साधून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
राजकीय वातावरण आता संवेदनशील असून, मतदान प्रक्रियेत कोणताही गैरफायदा होऊ नये, याकडे प्रशासन आणि पक्ष दोघेही लक्ष देत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : बोटावरील शाई पुसली जात आहे, साईनाथ दुर्गे म्हणतात, “गाफिल राहू नका, सतर्क राहा!” मुंबई – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरला जात असून, ती शाई सहज पुसली जात असल्याचे गंभीर संकेत मिळाले आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) चे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सर्व कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे, कोणीही शाई पुसली जाण्याचा गैरफायदा घेऊ नये, असे त्यांनी निर्देश दिले आहेत.
दुर्गे यांनी गाफिल राहू नका असेही सांगितले असून, मतदानाची प्रक्रिया सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे जोरदार मत व्यक्त केले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Malegaon Municipal Corporation Election : मतदार यादीतील घोळ मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत मतदार यादीत झालेल्या घोळामुळे मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली गेली आहे.
मात्र, इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी मालेगावकरांना आवाहन केले आहे की, मतदारांनी जागरूक होऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी.
मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पार्टीने समाजवादी पार्टीसोबत युती करून 'मालेगाव सेक्युलर फ्रंट' नावाने निवडणूक लढवली होती. आसिफ शेख यांनी म्हटले की, या निवडणुकीत मालेगाव सेक्युलर फ्रंटला बहुमत मिळेल. तसेच, जर अन्य पक्ष त्यांच्या अटी-शर्तींना मान्य असतील, तर त्यांना आपल्या युतीमध्ये सामील केले जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
मालेगावकरांच्या सक्रिय मतदानामुळेच नगरपालिकेतील सत्ता स्थिर होईल, असा विश्वास आसिफ शेख यांनी व्यक्त केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026 : मुंबईपासून पुण्यापर्यंत मतदान गती मंद, कुठे किती टक्के मतदान झाले? निवडणुकीचे थेट अपडेट्स एका क्लिकवर आजच्या महापालिका आणि सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत काही महत्वाचे मतदानाचे आकडे समोर आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी ९.३० पर्यंत ६.९८% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी ७ ते ८ या एका तासात अंदाजे ७ ते ८% मतदान झाले आहे.
तर पुण्यातील पहिल्या दोन तासांत फक्त ५.५% मतदान नोंदले गेले आहे.
सोलापूरमध्ये सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.८६% झाली आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.४५% इतकी आहे.
परभणी शहर महानगरपालिकेसाठी सकाळच्या दोन तासांमध्ये 9.10% एवढं मतदान...
मालेगाव महापालिका निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 11.09 टक्के मतदान...
अमरावती महानगरपालिका निवडणूक - सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 6.6 टक्के मतदान..
पिंपरी चिंचवड - महापालिकेच्या निवडणुकीत साडेनऊ वाजेपर्यंत 6.56 टक्के मतदान...
सकाळच्या ह्या तासांत मतदानाची गती तुलनेने मंद असल्याचे दिसून येत असून, नागरिकांनी अधिक सक्रिय होऊन मतदान करावे, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : मुंबईत सकाळी सुरुवातीच्या तासांत मतदान फक्त 6.98 टक्के मतदान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी केवळ 6.98% इतकी नोंदवली गेली आहे.
नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्साह कमी असल्याचे दिसून येत आहे.
मतदान केंद्रांवर सुरळीतता असूनही, या कमी टक्केवारीमुळे निवडणूक प्रक्रियेवर काही प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रशासनाने मतदान वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Chandrapur Municipal Corporation Election : मतदार यादीत नाव नसल्याने मतदार जाताहेत परत चंद्रपूर :
मतदार यादीत नाव नसल्याने मतदार जाताहेत परत
अनेकांची नावे ऑनलाइन असतांनाही केंद्रावरील यादीत नावे नाही
मतदार मतदानापासून वंचित
चंद्रपूर येथे मतदान केंद्राच्या यादीत नावं सापडत नसल्याने मतदारांना आल्या पावली परतावे लागलेय. निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन यादीत नाव आहे. पण ज्यावेळी मतदार मतदान केंद्रावर मतदार पोहचतो त्यावेळी तेथे असलेल्या यादीत नावच दिसत नाही. राजीव गांधी महाविद्यालय या मतदान केंद्रावर हा गोंधळ पहायला मिळतोय. यादीत नावं दिसत नसल्याने अनेक मतदार परत जात असल्याचे चित्र येथे आहे. तर दुसरीकडे दोन तीन मतदान केंद्रावर नाव शोधत आलेले मतदार परत जात आहेय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Municipal Corporation Election : नागपूर महानगरपालिका निवडणुकीत दिव्यांग मतदारांकारिता विशेष सोय.... नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
याप्रक्रीयेत दिव्यांग मतदारांना सहभाग नोंदविता यावा करिता मनपा प्रशासनाद्वारे दिव्यांग मतदारांकारिता विशेष सोय करण्यात आली आहे.
लोकेशन शेअर केल्यानंतर मतदान बूथ वर ये-जा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये घरून मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र या निवडणूकित कुठलीही व्यवस्था नसल्याने मतदानाचा टक्का वाढावा याकरिता नागपूर पालिका प्रशासनाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना बूथपर्यंत ये जा करण्याकरिता वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
व्हाट्सअप क्रमांक निर्गमित करण्यात आला असून त्या व्हाट्सअप क्रमांकावर कॉल करून लोकेशन शेअर केल्यावर प्रशासनाकडून वाहनाची व्यवस्था केली जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election : गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान करणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचं नाव मतदार यादीतून गायब आहे तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनाच त्यांचं मतदान कुठं आहे हे माहित नसेल तर सामान्य लोकांना हे कसं कळणार? केवळ सत्तेतील एका पक्षाच्या सोयीसाठी वॉर्ड/प्रभाग रचनेपासूनच याची सुरवात झाली असून मतदारांचे चेहरे आणि आडनाव बघून त्यांना सोयीच्या प्रभागात टाकण्यात आलं. गणेश नाईक साहेब हे सत्तेत असूनही भाजपच्या रणनीतीची शिकार झाले आहेत. संपूर्ण राज्यात हीच अवस्था असून याबाबत निवडणूक आयोगाला जबाबदारी झटकता येणार नाही, उत्तर द्यावं लागेल..!
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Municipal Corporation Election : काँग्रेसचे कार्यालय जाळले की जळाले? - काँग्रेसचे कार्यालय जाळले की जळाले?
- प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालयाबाहेरील पेंडोल आणि पडदे व पक्षाचे झेंडे जळाले आहे.
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करत कार्यालय बाहेरील पेंडॉल पडदे आणि पक्षाचे झेंडे जाळण्यात आल्याचा आरोप केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Parbhani Municipal Corporation Election : 100% शिवसेनेचाच महापौर महापालिकेत बसेल, उबाठा शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी संपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला.
त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की परभणी शहर महानगरपालिकेवर 100% महाविकास आघाडीचाच झेंडा फडके भाजपने प्रचंड लक्ष्मी अस्त्राचा वापर केला असला, तरी परभणीकर मात्र शिवसेना काँग्रेसच्याच पाठीशी आहेत.
65 पैकी 45 जागा जिंकत महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल त्याचबरोबर शिवसेनेचा महापौर परभणी महापालिकेत बसेल आणि इथूनच परिवर्तनाची सुरुवात होईल असा विश्वास आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेत देखील शिवसेनाच सत्तेमध्ये येईल प्रशासन काळात महापालिकेच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर संपविण्याचे काम याच माहिती सरकारने केले आहे.
त्यामुळे मुंबईकर पुन्हा एकदा ठाकरेंवर विश्वास ठेवतील असे देखील आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ichalkaranji Municipal Corporation Election : प्रभाग 5 मध्ये पैसे वाटपाचा वाद, भाजप–शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये एका हॉलमध्ये भाजप उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याचा वाद उभा राहिला.
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पैसे वाटपाबद्दल जाब विचारला असता दोन्ही पक्षांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
घटनेवेळी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली, तर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण देखील तयार झाले होते.
या हॉलमध्ये अनेक नागरिक उपस्थित होते आणि या नागरिकांनाच पैसे दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
स्थानिक नागरिक आणि पक्षीय नेत्यांमध्ये या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तपास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election : मृत माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे नाव मतदार यादीत; प्रशासनावर प्रश्नचिन्ह छत्रपती संभाजीनगरमधील माजी शिवसेना नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्ये निधन झाले असतानाही, त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत असल्याचे उघड झाले आहे.
या गंभीर त्रुटीमुळे निवडणूक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, मोरेश्वर सावे हे अतुल साहेब यांचे वडील होते. मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत राहणे ही निवडणूक प्रक्रियेसाठी गंभीर समस्या ठरू शकते.
स्थानिक नागरिकांनी यावर चिंता व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nashik Municipal Corporation Election : शिंदे सेनेचे उमेदवार महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी घेतला आक्षेप नाशिक ब्रेकिंग...
- प्रभाग क्रमांक २४ मधील मतदान केंद्रावर शिंदे सेनेचे उमेदवार महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी घेतला आक्षेप...
- मतदानासाठी पाच मिनिटापेक्षा अधिक वेळ मतदारांना लागत असल्याने घेतला आक्षेप
- संबंधित मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मशीन आले बदलण्यात
- प्रभाग क्रमांक २६ मधील मॉर्डन स्कूल मतदान केंद्रावर अर्ध्या तास थांबले होते मतदान...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Malegaon Election News : महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पॉईंटर...
- मतदार राजाला आवाहन...
- मतदान आपले कर्तव्य आहे...विकासासाठी मतदान करावे...
- राजकीय बोलणार नाही...
- सर्वांना माहीत आहे मतदान कुठे करायचे
- जनता भरभरून आशीर्वाद देईल
- एकनाथ शिंदे काळात अनेक क्रांतिकारक निर्णय झाले..त्यांच्या नेतृत्वाला भरभरून मतदार आशीर्वाद देतील...
- जिथे शिवसेना तिथे शिवसेना ज्या ठिकाणी महायुती आहे तिथे महायुती विजयी होईल...
- मालेगावची राजकीय सामाजिक परिस्थिती वेगळी आहे..
- मालेगावात 84 पैकी शिवसेना 24 जागेवर निवडणूक लढत आहे 24 विजयी होतील
- नाशिकमध्ये शिवसेना , राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेनेचा भगवा फडकेल..
- मालेगाव आज प्रथम मतदान होणे महत्वाचे त्यानंतर महापौर पदाचे बघू आहे...
- मुंबईमध्ये भव्य दिव्य प्रकल्प पूर्ण झाले.
- मराठी माणसांसाठी केलेले काम त्यामुळे मुंबईकर शिवसेना - भाजप महायुतीची सत्ता येईल..
- महाराष्ट्रात फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे...
- उद्धव आणि राज ठाकरेंना लगावला टोला..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Akola Election News : वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मतदानाचा हक्क बजावला वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पत्नी प्रा. अंजली यांच्यासह आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील कृषीनगर भागातील मनपाच्या शाळा क्रमांक 22 मध्ये आंबेडकरा़नी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आंबेडकर दांपत्याचं मतदान अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील कृषीनगर भागात येतंय. येथून वंचितने चारही उमेदवार दिलेयेत.
तर महापालिकेत वंचितने स्वबळावर 54 उमेदवार दिलेयेत. मतदानानंतर प्रकाश आंबेडकर आणि प्रा.अंजली आंबेडकर यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : अभिनेत्री हेमा मालिनी मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचल्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी मुंबईच्या जुहू येथील जमनाबाई नर्सी शाळेवरील मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचल्या
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान केंद्र क्रमांक 49 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद...
मशीन वरील काही बटन प्रेस होत नसल्याने मतदान प्रक्रिया काही वेळ थांबवली असल्याचं उमेदवार सचिन चिखले यांनी स्पष्ट केली...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahangarpalika Election 2026 Nivedita Ekbote : प्रभाग 12 मध्ये मतदानाच्या वेळी दहशत; निवेदिता एकबोटेचा गंभीर आरोप प्रभाग क्रमांक 12 मधील भाजप उमेदवार निवेदिता एकबोटे यांनी गंभीर आरोप केला आहे की, त्यांच्या विरोधी उमेदवार बाळासाहेब बोडके यांच्या कार्यकर्त्यांकडून मॉडर्न हायस्कूल मतदान केंद्रावर महिलांवर आणि त्यांच्या वर धावून जाऊन दहशत निर्माण केली गेली.
एकबोटे म्हणाल्या, "महिलांच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी ही घटना असून, अशा प्रकारच्या हिंसाचारावर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे."
मतदानाच्या दिवशी प्रभागातील काही केंद्रांवर वातावरण तणावपूर्ण असल्याचे नोंदवले गेले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahangarpalika Election 2026 : श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांनी मतदानाचा हक्क बजावला श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांनी प्रभाग 14 मधील गरवारे स्कूल मध्ये जात आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
प्रभाग 14 मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पॅनलमध्ये सुरस आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव महापालिकेसाठी मंत्री दादा भुसे यांनी बजावला मतदानाचा हक्क... मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज मालेगावच्या सोयगाव भागातील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मंत्री भुसे यांच्या पत्नी दोन्ही मुले, सुना आदींनी सोबतच मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला.ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली होती.
मतदारांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादाच्या जोरावर आपला विजयी निश्चित होणार असल्याचा विश्वास देखील दादा भुसे यांनी व्यक्त करतांनाच मंत्री भुसे यांनी मतदार राजाला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahangarpalika Election 2026 : मुंबईत भाजप 90 अन् शिवसेना 40 जागा मिळतील, पुण्यात तर...; चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा भाजपचे माजी नेते चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आधीच आपला विश्वास खुलासा केला आहे. पाटील म्हणाले, "2014 मध्ये मोदींवर आरोप-प्रत्यारोपांचा काहीसा परिणाम होई, पण आता ते सर्व फक्त बुडबुडे आहेत. मोदींचे चिन्ह कमळ असो की मोदींचा चेहरा, लोकांचा विश्वास एकसारखा आहे."
ते पुढे म्हणाले, "गणेश बिडकर आणि आमचे इतर सहकारी २४ मध्ये मोठ्या मार्जिनने विजयी होतील. ११५ जागांना तर आमच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. ज्यांना पैजा लावायची आहे, त्यांनी लावायला हरकत नाही."
अजित पवारांविषयी बोलताना पाटील म्हणाले, "आमची पार्टी तुटली नाही, आमची पार्टी लोकशाही मानते. राज्यातील काही नेत्यांच्या over कॉन्फिडन्स आणि उर्मटपणामुळे आम्ही बॅकफूटवर गेलेलो होतो."
मुंबई-ठाणे-पुण्यासह ६ महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा पाटील यांनी केला. ते म्हणाले, "मुंबईत भाजप ९० आणि शिवसेना ४० जागा मिळवेल. पुण्यात तर ११५ पेक्षा कमी जागा नाहीत."
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahangarpalika Election 2026 : “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप “माझ्या प्रभागात भाजपकडून थेट पैसे वाटप झाल्याचे व्हिडीओ माझ्याकडे उपलब्ध आहेत. हा उघड भ्रष्टाचार असून पुणेकर हे सर्व पाहत आहेत,” असा गंभीर आरोप करत प्रशांत जगताप यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
“गेल्या 26 वर्षांपासून ज्या लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केलं, त्यांच्याच काहींनी आज माझ्या विरोधात येऊन प्रचार केला. याचं मला मनापासून दुःख असून याची खंत वाटते,” असं भावनिक वक्तव्य जगताप यांनी केलं.
यावेळी त्यांनी आणखी धक्कादायक दावा करत सांगितलं की, “माझ्या आईच्या विरोधात आणि माझ्या विरोधातच उमेदवार उभा करण्यात आला. यासंदर्भातील फोन रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत आणि योग्य वेळी ते समोर आणले जातील.”
कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना जगताप म्हणाले, “आपण नेमकं कुणासाठी लढतो आहोत, याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने केला पाहिजे. पक्षासाठी आम्ही केवळ वेळच नाही, तर आमची प्रॉपर्टी विकण्यापर्यंत गेलो आहोत.”
“भाजपकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. मात्र पुणेकर अन्याय सहन करणारे नाहीत. जनता आम्हाला नक्कीच साथ देईल आणि आम्ही बहुमताच्या अगदी जवळ पोहोचू, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असा दावा करत प्रशांत जगताप यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : निवडणूक प्रक्रियेत पैसे वाटपाच्या आरोपांवर बोलताना सना मलिक काय म्हणाल्या? आमदार सना मलिक यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर आपली ठाम भूमिका मांडली. त्यांनी सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करत अधिकाधिक मतदान होणे लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
मतदान आणि पैसे वाटपावर भाष्य
निवडणूक प्रक्रियेत पैसे वाटपाच्या आरोपांवर बोलताना सना मलिक म्हणाल्या की, “संविधान न मानणारे लोक असे प्रकार करतात. निवडणूक हा लोकशाहीचा सण आहे, त्याला कलंक लावणाऱ्या घटनांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. यावर निवडणूक आयोग व संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करावी.”
दुबार मतदार आणि ‘भगवा गार्ड’वर प्रतिक्रिया
दुबार मतदान आणि कथित दमदाटीच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “अशी भूमिका घेतली तर तिला बळ देऊ नये. दुबार मतदारांची योग्य पडताळणी करून निर्णय घ्यावा आणि संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. दमदाटी करणे अजिबात योग्य नाही. मात्र आजपर्यंत दुबार मतदानाबाबत कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही,” असे त्यांनी सांगितले.
विजयाबाबत ठाम विश्वास
निवडणुकीतील विजयाबाबत सना मलिक यांनी आत्मविश्वास व्यक्त करत म्हटले, “यावेळी आम्ही केलेल्या तयारीनुसार आजवरचा रेकॉर्ड ब्रेक करून आम्ही जागा जिंकू. राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल.”
मराठी महापौराबाबत भूमिका
मराठी महापौराच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, “संविधानानुसारच मुंबईचा महापौर होईल.”
एकूणच, सना मलिक यांनी लोकशाही मूल्ये, स्वच्छ निवडणूक प्रक्रिया आणि विजयाबाबतचा आत्मविश्वास यांचा ठाम संदेश दिला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election : खासदार श्रीरंग बारणेंनी चिरंजीवाला पहिल्यांदा मतदान केलं... नगरसेवक, विधानसभा आणि तीन वेळा खासदारकी लढलेल्या श्रीरंग बारणेंनी यंदा पहिल्यांदाच चिरंजीवाला मतदान केलं.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नशीब अजमावत असलेले पुत्र विश्वजित आणि पुतणे निलेश यांच्यासाठी खासदारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
पुत्र आणि पुतणे एकाचवेळी एकाच प्रभागातून निवडणूक लढत असल्यानं बारणेंचा कस लागलाय.
भाजपने ऐनवेळी युती तोडल्यानं त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागलाय.
निवडणूक लढण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बारणेंचा या निवडणुकीत कसा कस लागला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Solapur Municipal Corporation Election : सोलापुरातील प्रभाग 10 मधील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार आणि अधिकाऱ्यांमध्ये बचाबाची सोलापुरातील प्रभाग 10 मधील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार आणि अधिकाऱ्यांमध्ये बचाबाची
अपक्ष उमेदवाराचं मतदानाचे बटन दाबत नसल्याची तक्रार मतदाराने केली असता अधिकाऱ्याने परस्पर भाजपचे बटन दाबल्याचा आरोप
प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार विजयकुमार अंकम आणि अधिकाऱ्यामध्ये वाद
अपक्ष उमेदवाराच्या नवासमोरील बटन दाबले जात नसल्याची तक्रार मतदाराने केली
मात्र मतदाराची तक्रारीनंतर अधिकाऱ्याने स्वतः परस्पर भाजपला मतदान केल्याचा मतदार आणि अपक्ष उमेदवाराचा आरोप
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Amravati Municipal Corporation Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामा आणि मामी यांनी बजावला मतदानाचा हक्क अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामा आणि मामी मतदान करायला मतदान केंद्रावर
देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे मामा चंद्रकांत कलोती आणि मोहिनी कलोती यांचं प्रभाग क्रमांक 13 मध्ये बालाजी प्लॉट मध्ये घर आहे.
मुधोळकर पेठ मधील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर ते फडणवीस यांचे मामा-मामी मतदान करताय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Akola Municipal Corporation Election : अकोल्यात EVM मध्ये तांत्रिक बिघाड अकोल्यात EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ होत आहेये, दुसरीकडे रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा संताप पाहायला मिळतो आहे.
अकोल्यातल्या बीआर हायस्कूल मतदान केंद्रावर गेल्या 20 मिनिट पासून खोली क्रमांक 7 मधील EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प...
अधिकाऱ्यांकडून ईव्हीएम मशीन दुरुस्त करण्याचं काम सुरू...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Vasai Virar City Municipal Corporation : मतदानासाठी गुलाब, लोकशाहीचा सन्मान वसई : लोकशाही बळकट करण्यासाठी आणि मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी वसई येथील गुजराती शाळेतील मतदान केंद्रावर एका सेवाभावी संस्थेच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.
मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला गुलाबाचे फुल देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून, गुलाबाचे फुल स्वीकारत मतदारांनी आनंद व्यक्त केला आहे.
“मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे,” हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mira-Bhayandar Municipal Corporation Election : मतदान शांततेत सुरू, मात्र मतदारांना अडचणी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे.
मात्र, मतदान यंत्रणेकडून पुरेशी जनजागृती न झाल्यामुळे अनेक मतदारांना आपल्या मतदान केंद्रांचा शोध घेत वेगवेगळ्या केंद्रांचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत.
त्यामुळे काही प्रमाणात मतदारांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या संदर्भात मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, प्रशासनाने मतदान केंद्रांची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचवायला हवी होती, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
विषयी मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी घेतला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Thane Mahangarpalika Election 2026 : ठाण्यातील पाचपाखडी भागातील मतदान केंद्र 41 मध्ये मशीन बंद ठाण्यातील पाचपाखडी भागातील सरस्वती शाळेतील मतदान केंद्र 41 मध्ये मशीन बंद पडली असून गेली एक तासापासून मतदान बंद आहे, लोकांचा खोळंबा झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : पुष्कर श्रोत्री यांनी वडिलांसह मतदानाचा हक्क बजावला
अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या 90 वर्षीय वडिलांसोबत मुंबईतील विले पार्ले येथे उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahangarpalika Election 2026 : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
पुणे : गुरुवार पेठेतील प्रभाग क्रमांक २६ मधील महात्मा गांधी उर्दू शाळा येथील मतदान केंद्रावर दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याची घटना घडली.
तसेच मतदारांची नोंदणी सिक्वेन्स चुकीची असल्याचे आढळून आले असून, ती अ, ब, क, ड या क्रमाने नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
याबाबत उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026 : सचिन तेंडुलकर सहकुटुंब मतदानासाठी हजर
सचिन तेंडुलकर यांच्यासोबत त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Dhule Municipal Corporation Elections : “धुळ्यात भाजपचाच झेंडा?, सहकुटुंब मतदान केल्यानंतर आमदार अनुप अग्रवालांचा मोठा दावा धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला.
उद्या जाहीर होणार निकालात भाजप 55+ जागांवर विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
धुळेकर जनता विकासाच्या बाजूने मतदान केले असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Solapur Mahanagarpalika Election 2026: सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन पाऊण तास बंद सोलापुरातल्या प्रभाग 7 मधील शाळा क्रमांक 9 मध्ये जवळपास पाऊण तासानंतर मतदान सुरु
सकाळी 7.30 वाजल्यापासून या केंद्रावर मतदान प्रक्रिया बंद होती
तांत्रिक बिघाड झाल्याने मशीन बंद होती
मात्र पाऊण तासांनी ही मशीन सुरु झाली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Navi Mumbai Election 2026: गणेश नाईकांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप एक तासाच्या धावपळी नंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पुर्ण
गणेश नाईक यांचे निवडणूक आयोग यंत्रणेच्या घोळावर गंभीर आरोप
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nashik Mahangarpalika Election 2026: नाशिकमध्ये दोन ईव्हीएम मशीन अर्धा तासापासून बंद - नाशिक प्रभाग क्रमांक 29 च्या खोली क्रमांक दोन मधले ईव्हीएम मशीन अर्धा तासापासून बंद..
- मतदान होत नसल्याने मतदारांना जवळपास अर्धा तास राहावे लागले ताटकळत...
- मशीन पुन्हा सुरू झाल्याची अधिकाऱ्यांकडून माहिती मतदार मतदान करण्यासाठी दाखल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला वार्ड क्रमांक १९२ चे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजाविला आहे. किल्लेदार मतदान करण्यासाठी आले असता मतदान केंदरावर दुबार मतदार ही आढळून आलेला आहे. या दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबविण्यात आले आहे तर आधार कार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदान करून दिले जाणार आहे. यावर किल्लेदार यांनी म्हटले आहे की, ही सगळी निवडणूक आयोगाची चूक आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Jalgaon Mahangarpalika Election: जळगावात मतदानापूर्वी गोंधळ जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला. दरम्यान, मशीनचा क्रम तसेच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार प्रतिनिधींची मागणी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mahnagarpalika Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदानाला सुरुवात राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदानाला सुरुवात. पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026: मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार
माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास मनाई
अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी
केवळ रांगेच चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका
राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींची कुठेही अडवणूक नाही
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Amravati Mahangarpalika Election 2026: अमरावती महानगरपालिकेसाठी आज मतदान, 87 जागेसाठी तब्बल 661 उमेदवार रिंगणात 6 लाख 77 हजार 180 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार
मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मतदान केंद्रावर आणि संपूर्ण शहरात 2700 पोलिसांचा असणार कडक बंदोबस्त ठेवण्यात आला
मतदानासाठी 3 हजार 600 कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली
एकूण जागा : 87
एकूण प्रभाग:22
सत्तास्थापनेसाठी जागा: 44
पक्ष आणि लढत असलेल्या जागांचा आकडा भाजप : 67 अपक्ष पाठींबा 5 एकूण
काँग्रेस: 62
उबाठा: 45
राष्ट्रवादी (अजित पवार) : 85
शिंदे सेना : 67
राष्ट्रवादी (शरद पवार) :14
वंचित+ युनायाटेड फोरम: 46
युवा स्वाभिमान पार्टी ( आ. रवी राणा यांची)35
बसपा:30
MIM: 25
सपा : 7
युती :
भाजप स्वतंत्र
शिंदे सेना स्वतंत्र
बसपा ( स्वतंत्र)
युवा स्वाभिमान पार्टी (स्वतंत्र)
वंचित+ युनायाटेड फोरम
राष्ट्रवादी शरद पवार + सपा
उबाठा+ काँग्रेस (मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण)
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahangarpalika Election 2026: रवींद्र धंगेकर आणि मुलाचं औक्षण, मतदानासाठी घराबाहेर पडले, कसबा गणपतीच्या दर्शनाला रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या मुलाचं पत्नीकडून औक्षण करण्यात आले. दोघेही मतदानासाठी घराबाहेर पडले, पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या दर्शनाला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Mahangarpalika Election 2026: नागपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी थोड्याच वेळात मतदान सुरु होणार - नागपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी थोड्याच वेळात मतदान सुरु होणार
- मतदान केंद्रांवर मॅाक पोलची प्रक्रिया सुरु
- नागपूरात आज ३००४ मतदान केंद्रांवर मतदान
- ९६४ इमारतींमध्ये होणार मतदान, ३२१ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश
- २४,८३,११२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
झोनल अधिकारी २४४, केंद्राध्यक्ष ३,५७९, मतदान अधिकारी - १०,७३७
- एकूण १६,००० निवडणूक कर्मचारी सज्ज
- सुरक्षेसाठी ५ हजार पेक्षा जास्त पेलीस,१६७ पथके पथकं तैनात
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BMC Election 2026: मतदानाच्या दिवशी ठाकरे बंधूंसाठी संदीप देशपांडेंची पहिली पोस्ट = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Pune Mahanagarpalika Election 2026: पुणेकरांचा कौल आज मतपेटीत! तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पुणेकरांचा कौल आज मतपेटीत! तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान
पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक येणार निवडून
पुण्यात होणार चौरंगी लढत! महायुती मध्ये असणारे तिन्ही पक्ष लढणार वेगळे
भाजपला दोन्ही राष्ट्रवादी चे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात
एकूण निवडणूक लढवणारे उमेदवार: 1153
पुणे शहरातील एकूण मतदार: 35 लाख 52 हजार 637
पुरुष मतदार: 18 लाख 32 हजार 789
महिला मतदार: 17 लाख 13 हजार 360
शहरातील एकूण मतदार केंद्र: 4011
इतर मतदार: 488
बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या: 2
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Elections 2026 Voting list: मतदार यादीत नाव कसं शोधाल? ओळखपत्र नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र मतदानाला चालणार का? जाणून घ्या मतदार यादीत तुमच नाव आहे का? तसेच, मतदान ओळखपत्र नसेल तर कसं मतदान करायचं? त्यासाठी इतर कोणते ओळखपत्र असावेत? हे तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या ऑनलाईन पद्धतीने तपासून घेऊ शकता. यामुळे ऐनवेळी तुमचा गोंधळ होणार नाही. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Maharashtra Mahanagarpalika Elections 2026 : मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवरती राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचं (Vidhan Sabha Elections 2024) बिगुल वाजलं आहे. उद्या (१५ जानेवारी) मतदान पार पडणार आहेत. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांवर नेते निवडून येतात. निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. काही वेळा अचानक बऱ्याच जणांची नावं मतदार यादीतून गायब होतात आणि हे बघून त्या मतदारांचा हिरमोड होतो. तर काही मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात जातात, त्यामुळे आताच आपण आपलं नाव मतदार यादीत आहे का? हे घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासून पाहूया. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nagpur Mahangarpalika Election 2026: नागपुरात महापालिका निवडणूक रक्तरंजित नागपुरात भाजपच्या उमेदवार वर जीवघेणा हल्ला झाला आहे... प्रभाग 11 चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे.. त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... प्रभाग 11 मधील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा भाजपचा आरोप आहे... या हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mira Bhayandar Election 2026: मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी 24 प्रभागातील 95 नगरसेवकांच्या निवडीसाठी 435 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडत असून पहाटे साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत 24 प्रभागातील 95 नगरसेवकांच्या निवडीसाठी 435 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 8 लाख 19 हजार 161 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून शहरातील 958 मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत .या ठिकाणी पुरेसे मतदान कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे , कडेकोट पोलीस बंदोबस्त तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत विशेष म्हणजे यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांना 20 टक्के प्रवास सवलत देण्यात आले असून हॉटेल आणि उपाहारगृह येथेही सवलत देण्याच्या सूचना करण्यात आले आहेत या महानगरपालिकेत 20 पेक्षा अधिक मतदान केंद्रावर सामाजिक जाणीव जपणाऱ्या विविध थीम्स राबविण्यात येणार असल्याची माहिती ही आयुक्तांनी दिली असून हे मतदान सुरळीतपणे पार पडावं म्हणून सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Dhule Mahangarpalika Election 2026: धुळे महापालिकेच्या 19 प्रभागांसाठी तब्बल 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात धुळे महापालिकेच्या 19 प्रभागांसाठी तब्बल 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून आज होणाऱ्या मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप हि स्व बळावर ही निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले... तर दुसरीकडे भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित आली होती... तर एम आय एम ने देखील तब्बल 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत...धुळे महानगरपालिकेचे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मूलभूत सोयीसुविधांसोबत धर्माचा मुद्दा प्रचंड गाजला होता... महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या प्रचार सभा झाल्या होत्या, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यादेखील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, मात्र महाविकास आघाडीचा एकही नेता प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही... यामुळे आज होणाऱ्या मतदानानंतर मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे... धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 519 मतदान केंद्र उभारण्यात आले असून, 3500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Nanded Mahanagarpalika Election: नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला धमकावणाऱ्या 7 जणांना अटक - काँग्रेस उमेदवाराची बॅग चोरून नेलेल्या 7 जणांना अटक
- तुझा बियाणी करतो अशी धमकी दिली त्या संदर्भात भाग्यनागर पोलीस स्टेशन मध्ये शिवाजी भालेराव यांनी तक्रार दाखल केली होती
- एक खंजीर सह पल्सर गाडी रोख 10000 हजार रुपय जप्त केले
- आज भाग्यनगर पोलिसांनी 7 आरोपीची धिंड काढली
- 6 आरोपी हे 18 ते 22 वयोगटातील आहे तर 1 अल्पवयीन आरोपी आहे
- आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत अटक केली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026: कुठे कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला? Municipal Election Maharashtra Live 2026: कुठे कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?
मुंबई महापालिका
उद्धव ठाकरे - राज ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे
((मशाल-इंजिन विरुद्ध धनुष्यबाण))
मुंबई
उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस
(मशाल विरुद्ध कमळ))
ठाणे
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे - राज ठाकरे
((धनुष्यबाण विरुद्ध मशाल-इंजिन))
नवी मुंबई
गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे
((भाजप विरुद्ध धनुष्यबाण))
कल्याण-डोंबिवली
रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे
((भाजप विरुद्ध धनुष्यबाण))
पुणे
अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ
((राष्ट्रवादी घड्याळ विरुद्ध भाजप))
पिंपरी-चिंचवड
अजित पवार विरुद्ध महेश लांडगे
((राष्ट्रवादी घड्याळ विरुद्ध भाजप))
नाशिक
गिरीश महाजन विरुद्ध राज ठाकरे-उद्धव ठाकरे
((भाजप विरुद्ध मशाल-इंजिन))
कोल्हापूर
सतेज पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील
((काँग्रेस विरुद्ध भाजप))
छ. संभाजीनगर
संजय शिरसाट विरुद्ध अतुल सावे
((धनुष्यबाण विरुद्ध भाजप))
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026: कोणकोणत्या महापालिकांमध्ये कोणकोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला? Municipal Election Maharashtra Live 2026: कोणकोणत्या महापालिकांमध्ये कोणकोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला?
नागपूर
देवेंद्र फडणवीस - भाजप
विकास ठाकरे - काँग्रेस
मिरा-भाईंदर
नरेंद्र मेहता - भाजप
प्रताप सरनाईक - शिवसेना शिंदे
चंद्रपूर
सुधीर मुनगंटीवार – भाजप
विजय वडेट्टीवार - काँग्रेस
अकोला
रणधीर सावरकर - भाजप
प्रकाश आंबेडकर - वंचित
अहिल्यानगर
राधाकृष्ण विखे-पाटील - भाजप
निलेश लंके - राष्ट्रवादी (शप)
अमरावती
अनिल बोंडे - भाजप
यशोमती ठाकूर - काँग्रेस
सोलापूर
जयकुमार गोरे - भाजप
प्रणिती शिंदे - काँग्रेस
लातूर
अमित देशमुख - काँग्रेस
संभाजी पाटील-निलंगेकर - भाजप
सांगली
चंद्रकांत पाटील - भाजप
जयंत पाटील - राष्ट्रवादी (शप)
जळगाव
गिरीश महाजन - भाजप
एकनाथ खडसे - मविआ
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Municipal Election Maharashtra Live 2026: मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी आज मतदान Municipal Election Maharashtra Live 2026: मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडत असून पहाटे सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत 24 प्रभागातील 95 नगरसेवकांच्या निवडीसाठी 435 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 8 लाख 19 हजार 161 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून शहरातील 958 मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत .या ठिकाणी पुरेसे मतदान कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे , कडेकोट पोलीस बंदोबस्त तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत विशेष म्हणजे यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांना 20 टक्के प्रवास सवलत देण्यात आले असून हॉटेल आणि उपाहारगृह येथेही सवलत देण्याच्या सूचना करण्यात आले आहेत या महानगरपालिकेत 20 पेक्षा अधिक मतदान केंद्रावर सामाजिक जाणीव जपणाऱ्या विविध थीम्स राबविण्यात येणार असल्याची माहिती ही आयुक्तांनी दिली असून हे मतदान सुरळीतपणे पार पडावं म्हणून सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.