Eknath Shinde मुंबई :मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील (Siddhivinayak Ganapati Mandir) कथित देणगी घोटाळा प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोरआलीआहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंदिरात गेल्या पाच वर्षांत प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिलेआहेत. मंदिरात आलेल्या देणग्यांची नोंद, आर्थिक व्यवहार, दागिन्यांचा हिशेब आणि त्यांच्या व्यवस्थापनाची सखोल तपासणी या ऑडिटद्वारे केली जाणार असल्याचीमाहिती आहे.
दरम्यान, या लेखापरीक्षणाचा अहवाल आल्यानंतर संबंधित बाबींवर पुढील निर्णय घेतला जाणार असून, अनियमितता आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनीदिलीआहे. मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी काल (4 ऑगस्ट) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. याभेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरातच्याचौकशीचेनिर्देशदिलेआहे.
Siddhivinayak Ganapati Mandir: देणगी घोटाळा प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश; दोषी आढळ्यास कारवाईचा बडगा!
दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी काल (मंगळवार) मंत्रायलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचीभेटघेतलीहोती. जवळजवळ 20 मिनटेयादोघांचीभेटीदरम्यानचर्चाझाली. याभेटीनंतर मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोरआलीआहे. यावेळीअतिरिक्तमुख्यसचिवअसीम गुप्त यांनायासंदर्भातआदेशदेण्यातआलेआहे. मंदिरात गेल्या पाच वर्षांत प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिलेआहेत. यात मंदिराच्या आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापनाची सखोलचौकशीहोणारआहे. तसेचयातगैरप्रकारआणिअनियमितताआढळ्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं सूत्र सांगतायत. पाच वर्षातील देणग्याआणि मौल्यवान वस्तूंचे यामध्ये ऑडिट होणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव यांनायासंदर्भात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले.
Siddhivinayak Ganapati Mandir: देणग्या, दागिने, इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश
दरम्यान, या संपूर्ण लेखापरीक्षणांमध्ये मंदिरात गेल्यापाचवर्षांतकितीदेणगी, मौल्यवानदागिनेआणिइतरवस्तूदेणगीस्वरूपातप्राप्तझाली, त्याचबरोबर किती आर्थिक व्यवहार झालेले आहेत, त्या सगळ्याचा हिशोब देण्यास सांगितलेला आहे. या प्रकरणात व्यवस्थापनाची सखोल तपासणी देखील केली जाणार आहे. कारण गेल्या पाच वर्षांमध्ये ज्याप्रमाणे देणगी आल्या त्यातकुठेअनियमितताआहेका? जर आर्थिक अपहार झाला असेल तर नेमका कोणत्या क्षेत्रात झालेला आहे आणि जे आरोप करण्यात येत आहेतत्यातखरंचतथ्यआहेका? यासर्वबाबींवरयाचौकशीतभरदेणारयेणारअसल्याचीमाहितीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
